Maharashtra HSC Exam Result : बारावीच्या परीक्षेत लातूर पॅटर्न फेल, मुंबईचा निकाल काय? पाहा विभागनिहाय निकाल

Last Updated:

Maharashtra HSC Exam 2025 : यंदाच्या बारावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा निकालाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसून आले आहे. लातूर विभागाचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. 

प्रातिनिधीक  फोटो
प्रातिनिधीक फोटो
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा निकालाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसून आले आहे.  लातूर विभागाचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC) परीक्षेत एकूण 14,27, 085 नियमित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या 36,133 विद्यार्थ्यांपैकी 35 हजार 697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 154 पैकी 37 विषयांचा निकाल हा 100 टक्केल लागला.
advertisement

लातूर पॅटर्न फेल, मुंबईचा निकाल किती?

राज्यात कधी काळी लातूर पॅटर्नचा मोठा बोलबाला होत असे. मात्र, मागील काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात घट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसरीकडे लातूरमध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागाचा निकाल हा 89.46 टक्के इतका लागला. तर, मुंबई विभागाचा निकाल हा 92.93 टक्के इतका लागला.
advertisement

बारावीचा विभागनिहाय निकाल

- कोकण - 96.14
- छत्रपतीसंभाजी नगर - 92.24
- मुंबई - 92.93
- पुणे - 91.32
- कोल्हापूर - 93.64
- लातूर - 89.46
- अमरावती - 91.43
- नागपूर - 90.52
- नाशिक - 91.31

इथं पाहा झटपट निकाल... 

मुलींनी मारली बाजी...

advertisement
यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर,  विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.

इतर संबंधित बातमी: 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra HSC Exam Result : बारावीच्या परीक्षेत लातूर पॅटर्न फेल, मुंबईचा निकाल काय? पाहा विभागनिहाय निकाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement