अखेरीस मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकाच वेळी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतीनुसार मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किती ठिकाणी मतदान होणार याबद्दल निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. लिंकवर क्लिक करा
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा
अर्ज
10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात
17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर 2025
अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह 26 नोव्हेंबर 2025
मतदान – 2 डिसेंबर 2025
मतमोजणी – 3 डिसेंबर 2025
विभागवार नगरपरिषदा
कोकण- 27
नाशिक – 49
पुणे- 60
संभाजीनगर- 52
अमरावती- 45
नागपूर 55
नामनिर्देशन पत्र 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत 17 नोव्हेंबर
छाननी 18 नोव्हेंबर
माघारी घेण्याची 21 नोव्हेंबर
निवडूक चिन्हा 26
2 डिसेंबरला मतदान
3 डिसेंबरला निकाल
मतदान केंद्राच्या इमारतीत फोन नेता येईल, मात्र केंद्रात नाही
बूथ कर्मचारी मोबाईल कुठवर नेऊ द्यायचा ते ठरवतील
३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या याद्यांनुसार मतदान
६६ हजार ७७५ निवडणूक अधिकारी, कर्मचारी असतील
५३ लाख पुरुष तर ५३ लाख २२ हजार महिला मतदार आहेत
१३ हजार ३५५ मतदान केंद्रे असतील
२८८ अध्यक्षपदासाठी तर ३ हजार ८२० सदस्यांसाठी निवडणूक होईल
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत दिली आहे. त्याानंतर २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल
मतदारांना मतदान केंद्र आणि यादीत नाव शोधण्यासाठी नवीन ऍपची सुविधा देण्यात आली आहे. उमेदवाराविषयीची माहिती मतदारांना या खास ऍपवर मिळेल. दुबार मतांची वेगळी नोंद असेल. दुबार मतदारांच्या नावपुढे डबल स्टार चिन्हांकित केलं असेल. गुलाबी मतदार केंद्रावर कर्मचारी आणि महिला पोलीस असतील.
दुबार मतदार करता येणार आहे, एकाच मतदाराच्या नावासमोर स्टार चिन्ह दिसणार आहे. त्यामुळे एका मतदाराला नगर परिषद आणि जिल्हा परिषदेसाठी दोन वेळा मतदान करता येणार आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आल्यामुळे ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांसाठी ७ नोव्हेंबरपासूनच्या याद्या वापरणार आहे. निवडणूक ही EVM मशीन द्वारेच होणार आहे. नगरपरिषदेसाठी एका मतदाराला २ ते ३ मतदान करता येईल तर नगरपंचायतीसाठी २ मतदान करता येईल
288 नगराध्यक्ष निवडले जाणार
ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज स्वीकारले जाणार आहे
अर्ज भरताना जात प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे
७ नोव्हेंबरपर्यंतच्या मतदार याद्या वापरल्या जाणार असून EVM द्वारे निवडणूक होणार
२४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची पत्रकार परिषद सुरू.
३१ जानेवारी पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा सुप्रीम कोर्टान आदेश दिला आहे. त्यानुसार आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षित नगरपरिषद (16 पदे)
राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.