Maharashtra Local Body Election : लागा तयारीला, नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधीपासून? समोर आली अपडेट...

Last Updated:

Maharashtra Local Body Election : निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासही सुरुवात केली. नगरपालिकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

लागा तयारीला, नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधीपासून? समोर आली अपडेट...
लागा तयारीला, नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधीपासून? समोर आली अपडेट...
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मागील काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका करण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला होता. त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडे निवडणुकीसाठीच्या इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासही सुरुवात केली. नगरपालिकांबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याची मुदत राज्य निवडणूक आयोगाने वाढवली आहे. त्यानंतर राज्यात आधी नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. आता तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नगरपालिका निवडणूक कधी?

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असून, नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया डिसेंबरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने यासाठी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनादरम्यान सरकारला कोणत्याही नवीन घोषणा करता येणार नाहीत, फक्त विधेयकांची मंजुरी इतकाच कार्यक्रम मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
advertisement
डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करून त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता कधी?

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक ही विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा पहिला टप्पा असणार आहे. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार लागण्याची शक्यता आहे. जानेवारी 2026 अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Election : लागा तयारीला, नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधीपासून? समोर आली अपडेट...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement