Police Bharti 2025: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा

Last Updated:

Maharashtra Police Bharti Meeting : मागील काही काळापासून पोलीस भरती रखडलेली होती. मात्र रखडलेली भरती आता पुढच्या काही महिन्यात होऊ शकते, असे संकेत शासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस भरती
मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून २०२४-२५ च्या पूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे.
कठोर मेहनत, योग्य आहार आणि सातत्यपूर्ण सराव या त्रिसूत्रीवर भर देत अनेक उमेदवार पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. मागील काही काळापासून पोलीस भरती रखडलेली होती. मात्र रखडलेली भरती आता पुढच्या काही महिन्यात होऊ शकते, असे संकेत शासनाने दिले आहेत.

पोलीस भरतीसंदर्भात अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

पोलीस भरतीची तयारी राज्यभरातून लाखो तरुण-तरुणी करीत असतात. पुढच्या काही महिन्यांत पोलीस भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. कारण शासन स्तरावर तयारीसाठीची महत्तपूर्ण बैठक बोलाविण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११:०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक बोलविण्यात आली आहे.
advertisement
बैठकीसाठी मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस आयुक्त, नागपूर शहर पोलीस आयुक्त, नवी मुंबई पालीस आयुक्त, मीरा भाईंदर, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, नाशिक शहर पोलीस आयुक्त, संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त, अमरावती शहर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.
advertisement

पोलीस भरती संदर्भातील जाहिरात लवकरच निघणार?

भरतीसाठीची पूर्व तयारी झाल्यानंतर राज्य सरकारकडून लवकरच पोलीस भरती संदर्भातील जाहिरात जाहीर होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांसाठी दोन टप्पे

पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना दोन टप्पे पार करावे लागतात – लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी. यामध्ये लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असतात. त्यानंतर पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Police Bharti 2025: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement