Maharashtra Politics : सत्ताकारणात मराठा वर्चस्वाला धक्का, ओबीसी आमदारांच्या संख्येत वाढ, निवडणूक निकालाने समीकरणात बदल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तेची नवी समीकरणे जुळणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ताकारणात मराठा वर्चस्वाला धक्का बसला असून ओबीसी आमदारांची संख्या वाढली आहे.
मुंबई :  राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीच्या विजयासाठी अनेक कारणं असले तरी ओबीसी मतदार एकवटल्याने मोठं यश मिळाल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तेची नवी समीकरणे जुळणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ताकारणात मराठा वर्चस्वाला धक्का बसला असून ओबीसी आमदारांची संख्या वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आपली व्यूहरचना बदलली आहे. राज्याच्या 14 व्या विधानसभेत कुणबी-मराठा वगळून 40 ओबीसी आमदार होते. आता ती संख्या 78 इतकी झाली आहे. तर, मराठा आमदारांची संख्या घटली आहे.
मराठा आमदारांची संख्या घटली...
निवडणूक निकालानंतर अस्तित्वात आलेल्या राज्याच्या विधानसभेत सर्व पक्षीय मराठा आमदारांची संख्या 104 आहे. त्याआधी 118 मराठा आमदार विधानसभेत होते.
advertisement
ओबीसी आमदारांची संख्या वाढली...
मागील विधानसभा निवडणुकीत 40 ओबीसी आमदार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत कुणबी-मराठा आमदारांसह ही संख्या 78 झाली आहे. यामध्ये फक्त भाजपचेच 43 ओबीसी आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये विदर्भ आणि खान्देशचा मोठा वाटा आहे. मागच्या विधानसभेत भाजपचे २४ ओबीसी आमदार होते.
राज्यात ओबीसी प्रवर्गात जवळपास 409 जाती आहेत. यंदाच्या विधानसभेत ओबीसी आमदारांमध्ये
advertisement
कुणबी, कुणबी- मराठा, तेली, आगरी, धनगर, वंजारी, बंजारा, माळी या जातींचे वर्चस्व दिसते. त्याशिवाय, पाचकळशी, वैश्यवाणी, लेवा पाटील, गुज्जर, पोवार, बारी, गांधली, साळी या जातींचे काही आमदारही विधानसभेत निवडून गेले आहेत.
>> कोणत्या पक्षाचे किती ओबीसी आमदार?
- भाजप 43,
- शिवसेना (शिंदे) 13,
- राष्ट्रवादी (अजित पवार) 9
- काँग्रेस 4
advertisement
- राष्ट्रवादी (शरद पवार) 3
- शिवसेना (ठाकरे) 3
- इतर पक्ष 3
विधानसभेत कोणाचे किती प्रतिनिधीत्व?
मराठा 104
ओबीसी 78
मुस्लीम 10
मारवाडी 9
ब्राह्मण 6
गुजराती 4
लिंगायत 4
सीकेपी 3
जैन 3
उत्तर भारतीय 3
जीएसबी 2
कोमटी 2
सिंधी 1
राज्यात अनुसूचित जातींसाठी 29 आणि अनुसूचित जमातींसाठी 25 मतदारसंघ राखीव आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 20, 2024 9:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : सत्ताकारणात मराठा वर्चस्वाला धक्का, ओबीसी आमदारांच्या संख्येत वाढ, निवडणूक निकालाने समीकरणात बदल


