SSC Results 2025: आज दहावीचा निकाल, इथं एका क्लिकवर पाहा झटपट आणि वेगवान रिझल्ट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
How to Check SSC Results 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10 वी (दहावी) परीक्षेचा निकाल, मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा करिअरला दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10 वी (बारावी) परीक्षेचा निकाल, मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या निकालात घट दिसून आल्याने दहावीचा निकाल कसा असणार, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत. त्याचप्रमाणे 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
advertisement
शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही डिजीलॉकरवर पाहता येणार आहे.
>> दहावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process For SSC Results)
1. निकालासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘SSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
advertisement
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
>> इथं पाहा झटपट दहावीचा निकाल...
दहावीचा निकाल थेट इथं पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. पुढील काही वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
> https://results.digilocker.gov.in
> https://sscresult.mahahsscboard.in
> http://sscresult.mkcl.org
advertisement
> https://results.targetpublications.org
> https://results.navneet.com
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 13, 2025 7:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Results 2025: आज दहावीचा निकाल, इथं एका क्लिकवर पाहा झटपट आणि वेगवान रिझल्ट