Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेता का नेमत नाही? विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं तीन शब्दातच उत्तर; विषय क्लिअर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हिवाळी अधिवेशनच्या आदल्या दिवशी विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
नागपूर : राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलंच गाजलं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तापलाय. राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केलीय तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होतो, यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. हिवाळी अधिवेशनच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या आणि विरोधी पक्षनेता न निवडणाऱ्या सरकारच्या चहापानासाठी का जाव असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. घटनेत तरतूद असताना विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही अशी इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील.
advertisement
विरोधांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आत्ताचा विरोधी पक्ष दिशाहीन आहे. विरोधी पक्षावर कुणावरही विश्वास राहिला नाही.
विरोधक पायऱ्यावर आंदोलन करण्यात धन्यता मानत आहे. विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील. तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. तो अधिकार सरकारचा नसून अध्यक्ष आणि सभापतींचा आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.
advertisement
योजना चालवण्यासाठी राज्य रकार सक्षम : देवेंद्र फडणवीस
संविधानिक संस्थांवर विरोधकांची आगपाखड करत आहे. राज्य दिवाळखोर आहे हे दाखवण्याची विरोधकांना घाई लागली आहे. राज्याची आर्थिक स्थिती ओढताणीची पण दिवाळखोरीकडे वाटचाल नाही. इतर राज्यांच्या तुलनेत राज्य सक्षम असून योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सक्षम असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेता का नेमत नाही? विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं तीन शब्दातच उत्तर; विषय क्लिअर


