प्रभादेवी रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकल थांब्यात बदल, गर्दी विभागण्यासाठी मोठा निर्णय
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
परळ- एल्फिस्टन पुलाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. प्रभादेवी स्थानकावरील दक्षिण दिशेच्या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या थांब्यामध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
परळ- एल्फिस्टन रोड ब्रीजचे काम रेल्वेकडून आणि मुंबई महानगर पालिकेकडून युद्ध पातळीवर केले जात आहे. प्रभादेवी पुलावरील पादचारी भाग वापरण्यास बुधवारी बंदी घातल्यानंतर, प्रभादेवी रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली होती. यामुळे 24 तासांत पूल वापरासाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. याचसाठी आता रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेमका पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या दृष्टीने कोणता निर्णय घेतला? जाणून घेऊया....
परळ- एल्फिन्स्टन पूल पुनर्बांधणीच्या कामांमुळे प्रभादेवी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले होते. गर्दीचे प्रमाण, लक्षात घेता पश्चिम रेल्वेने अनेक मुख्य उपाय योजना सुरू केल्या आहेत. स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकलचे तीन डबे मागे थांबवण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती नंतर रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
बुधवारी चेंगराचेंगरीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 24 तासांतच पूल पुन्हा सुरू करण्यात आला. परळ- एल्फिन्स्टन पूल तोडून एमएमआरडीए वरळी-शिवडी कनेक्टर उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा पूल डबलडेकर पूल असणार आहे. प्रभादेवी रेल्वे स्टेशनवरील दक्षिण दिशेच्या पुलावरील गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या थांब्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिली आहे.
advertisement
मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर 12 मीटर आणि 6 मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल आहेत. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या दक्षिण पादचारी पुलावर अधिक गर्दी होते. येत्या आठवड्यात एल्फिन्स्टन पुलावरील पादचारी भाग बंद होणार असल्यामुळे स्थानकातील पादचारी पुलावरील गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिणेकडील पुलावरील गर्दी विभागण्यासाठी अतिरिक्त जिना आणि सरकते जिने जोडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रभादेवी रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकल थांब्यात बदल, गर्दी विभागण्यासाठी मोठा निर्णय


