Ajit Pawar : पुण्यानंतर महायुतीत आणखी एका ठिकाणी फूट, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा!

Last Updated:

Ajit Pawar : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आला. या ठिकाणी महायुतीत फूट दिसून आली. त्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे.

पुण्यानंतर महायुतीत आणखी एका ठिकाणी फूट, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा!
पुण्यानंतर महायुतीत आणखी एका ठिकाणी फूट, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा!
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आला. या ठिकाणी महायुतीत फूट दिसून आली. त्यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुती ही राष्ट्रवादीशिवाय आकाराला येत असल्याची चर्चा सुरू आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार विरुद्ध भाजप असे चित्र दोन्ही महापालिकेत दिसणार आहे. त्यानंतर आणखी एका महत्त्वाच्या महापालिकेत राष्ट्रवादीने स्वबळाची घोषणा केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्यात येणार असल्याची घोषणा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत असतानाच ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ठाण्यात राष्ट्रवादीने महायुतीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र या घोषणेनंतरही अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट नव्हती.
नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, मात्र ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटासोबत युती करणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका नजीब मुल्ला यांनी मांडली. हा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही मुल्ला यांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही स्वबळावर निवडणूक लढवण्याची जोरदार मागणी होत होती, त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
advertisement
ठाणे महापालिका क्षेत्रातील विशेषतः मुस्लीमबहुल मुंब्रा आणि आसपासच्या भागांतील राजकीय समीकरणे लक्षात घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठं आव्हान मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : पुण्यानंतर महायुतीत आणखी एका ठिकाणी फूट, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement