पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी विश्वासू मोहरा बाहेर काढला, 1992 पासून एकनिष्ठ असलेल्या नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.
प्रितम पंडीत, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही आमदार नसताना
लोकसभेची जागा जिंकली. आता स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला आव्हान देत पुन्हा
बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचा आहे. यासाठी शरद पवारांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड केली आहे. महेश गादेकर हे गेल्या 33 वर्षापासून सोलापुरातील राजकारणात शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. महेश गादेकर हे 1992 पासून शरद पवारांसोबत काम करतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि पवारांसोबत गेले. तेव्हापासून आतापर्यंत ते पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आता शरद पवारांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा विश्वासू नेत्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.
advertisement
जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्याचे मोठं आव्हान
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्याचे मोठं आव्हान आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य निवडणुकीची बांधणी करावी लागणार आहे. शरद पवार यांची विचारसरणी पुढे घेऊन जाण्याचा काम करणार आहे.
1992 पासून शरद पवारांसोबत
advertisement
खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सोलापूर शहराध्यक्ष असताना त्यांनी फिरता दवाखाना ही संकल्पना सलग पाच वर्षे राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.
सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्या सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्या संस्थाच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र शरद पवारांनी त्यांच्या हुकमी एक्क्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
November 10, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पक्षातील आऊटगोईंगनंतर पवारांनी विश्वासू मोहरा बाहेर काढला, 1992 पासून एकनिष्ठ असलेल्या नेत्याची सोलापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती


