मक्याला 2400 रुपयांची हमी, प्रत्यक्षात 1200 रुपयांनी खरेदी; हमीभावाचे वाजले बारा, शेतकऱ्यांची होतेय लूट..!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर धान्य बाजारात प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून मका हमीभावाच्या निम्म्या दरात म्हणजे 1200 ते 1300 रुपये क्विंटलने खरेदी केला जात आहे. तर, सोयाबीनही एक हजार रुपयांनी कमी दरात व्यापारी घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात राज्य सरकारने मक्याला प्रतिक्विंटल 2400 रुपये, तर सोयाबीनला प्रतिक्विंटल 5 हजार 328 रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर धान्य बाजारात प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून मका हमीभावाच्या निम्म्या दरात म्हणजे 1200 ते 1300 रुपये क्विंटलने खरेदी केला जात आहे. तर, सोयाबीनही एक हजार रुपयांनी कमी दरात व्यापारी घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करत असून मका हमीभावाने घ्यायला हवी आणि आता औषधांवरील जीएसटी कपात करून योग्य दरात मिळायला हवी अशी मागणी मका उत्पादक शेतकरी बाबासाहेब वाघ यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना केली.
मका पिकाची बियाणांची एक बॅग 1900 रूपयांना झाली, दहा 26- 26 तर खताची बॅग दोन हजार रुपयांना मिळतेय. याबरोरच वाहतूक आणि कामगार, नांगरणी, ट्रॅक्टरचा या सर्व बाबींना लागणाऱ्या खर्चाचा हिशोब केल्यास 50 हजार रुपयांपर्यंत खर्च जात आहे, त्यामुळे यंदा तरी मका पीक परवडणारे नाही. परतीच्या पावसामुळे देखील मका पिकाला नुकसानीचा फटका बसला.
advertisement
यामुळे 25 टक्के पीक खराब झाले मात्र जे पीक निघाले त्याला देखील हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता करायचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासनाने खत-औषधांचे त्यावरील जीएसटी रक्कम कपात करून शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात द्यावी तसेच मका व सोयाबीनला व्यापाऱ्यांनी हमीभावाने घेतली पाहिजे असे देखील यावेळी सांगण्यात आले.
Location :
Maharashtra
First Published :
November 10, 2025 10:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मक्याला 2400 रुपयांची हमी, प्रत्यक्षात 1200 रुपयांनी खरेदी; हमीभावाचे वाजले बारा, शेतकऱ्यांची होतेय लूट..!

