काळजात चर्रss करणाऱ्या किंकाळ्या; नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, 50 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस दरीत कोसळली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nandurbar Bus Accident: चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट 80 ते 100 फूट दरीत कोसळली.
निलेश पवार, प्रतिनिधी
नंदुरबार : जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवगुई घाटातल्या अमलीबारीजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसचा भीषण अपघाता झाला आहे. या अपघातात बस दरीत कोसळून दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून जवळपास तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही शालेय बस जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारेच्या अनुदानीत आश्रमशाळेची बस असल्याची माहीती देखील समोर येत आहे.
advertisement
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि मोलगींला जोडणाऱ्या देवगुई घाटात आज शालेय बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या गावावर आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस आज अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन अक्कलकुवाकडे परतत असतांनाच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट 80 ते 100 फूट दरीत कोसळली. बस अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 54 विद्यार्थी होते. यातील दोघा विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जावून मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलुकवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे देखील बोलल्या जात आहे. दरीत कोसळलेली ही बस जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे गावातील अनुदानीत आश्रमशाळेची बस असल्याची माहीती समोर येत आहे. या अनुदानीत आश्रमशाळेने आज दोन बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवल्याच बोलल्या जात आहे. यातील एका बसचा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या या बसमध्ये मुली आणि लहान बालकांचा समावेश असल्याचे देखील समजत आहे. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अपघात स्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे. या अपघाताबाबत अद्यापही पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाकडून कोणीही अधिकृतरित्या बोललेल नाही.
advertisement
जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार?
बसची क्षमता 30 ते 35 इतकी असतानाच जवळपास 52 विद्यार्थी आणि दोन कर्मचारी असे 54 जणांचा प्रवास या अपघातग्रस्त बस मधून केला जात होता. तर दुसऱ्या बसमध्ये देखील तितकेच विद्यार्थी आणि आयशर मध्ये देखील विद्यार्थ्यांना कुमून बेकायदेशीर पद्धतीने शाळेकडे नेल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष राहणार आहे.
advertisement
Location :
Nandurbar,Nandurbar,Maharashtra
First Published :
November 09, 2025 6:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काळजात चर्रss करणाऱ्या किंकाळ्या; नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, 50 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस दरीत कोसळली


