Manikrao Kokate: 'मग बरोबर आहे, सरकार कशाला ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालेल?' ठाकरेंच्या शिलेदाराचा बोचरा वार...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Manikrao Kokate: ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणण्याची मागणी करत असताना सरकार शांत का होतं, याचा उलगडा आज झाला असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
मुंबई: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर ऑनलाइन रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न जटील असताना दुसरीकडे सभागृहात कृषी मंत्र्यांचा ऑनलइन रमी खेळत असल्याचा व्हिडीओवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. ऑनलाइन गेमिंगवर बंदी आणण्याची मागणी करत असताना सरकार शांत का होतं, याचा उलगडा आज झाला असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि नापिकीच्या संकटात गढलेल्या ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कथित जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आता राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरत आहे.
ऑनलाईन गेमिंगमुळे राज्यातील तरुणाई आणि शेतकरी कुटुंबांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे. तरीही सरकारने यावर कारवाई का केली नाही, हे स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळातीलच काही सदस्य या गेमचे व्यसनी बनले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
advertisement
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
advertisement
कैलास पाटील यांनी म्हटले की, मी लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाईन गेमवर बंदी आणावी अशी सभागृहात मागणी केली होती. लाखो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होत असताना मुख्यमंत्री यांनी या गेम वर बंदी का नाही आणली हे आता मला कळत आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना याचे व्यसन लागले असल्याचे दिसून येत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
advertisement
ऑनलाईन गेम बंद करा ? युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करु नका..
स्व. आर.आर.आबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी अशी सभागृहात मागणी केली..
ऑनलाईन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे.. आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक… pic.twitter.com/eGYjM9MxSK
— Kailas Patil (@PatilKailasB) July 18, 2025
advertisement
सभागृहात शेतकरी कर्जमाफीचे वाट बघत आहे. तर, दुसरीकडे कृषी मंत्री ऑनलाइन रमीचा डाव रंगवत असल्यावरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स दाखवून द्यावे, असे आवाहन कैलास पाटील यांनी केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manikrao Kokate: 'मग बरोबर आहे, सरकार कशाला ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालेल?' ठाकरेंच्या शिलेदाराचा बोचरा वार...