Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाडापाडीवरून नरमले आणि फडणवीसांवर घसरले, 'तुम्हाला गुडघ्यावर..'

Last Updated:

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीवर भुमिका मांडली. यावेळी जरांगेंनी फडणवीसांना देखील टार्गेटवर घेतलं.

मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा देवेद्र फडणवीस
मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा देवेद्र फडणवीस
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका आंदोलनात लाठीचार्ज झाल्यापासून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शाब्दीक हल्ला करायला सूरूवात केली. त्यामुळे सतत जरांगेंच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस राहिले आहेत.पण विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर जरांगे फडणवीसांना टार्गेट करणं बंद करतील, असे बोलले जात होते. मात्र आता जरांगेंनी पुन्हा टार्गेटवर घेतलं आहे. तुम्ही अमुक दिलं तमुक दिलं या गुर्मीत राहु नका. पठ्या इथे उभा आहे, तुम्हाला गुडघ्यावरच टेकवणार. तुम्हाला आता सोडतच नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीवर भुमिका मांडली. यावेळी जरांगेंनी फडणवीसांना देखील टार्गेटवर घेतलं. 40-40 वर्ष काम करणाऱ्या नेत्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केला,आता जनता त्यांचा विचार करेल असे विधान फडणवीसांनी केल्याचं पत्रकारांनी जरांगेंना विचारलं. यावर जरांगे म्हणाले, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलांचा तुम्ही अपमान केला आहे.तुम्ही कितीही रस्त्यावर उतरा आणि आंदोलन करा, मी नाही देत आरक्षण तुम्हाला,अशी त्यांची भूमिका असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच गप्पा मारतो 40 वर्ष त्यांनी नाही दिलं.अरे त्यांनी नाही दिलं म्हणून तुला आणलं ना. पण तुम्ही शेतकऱ्यांचा एक प्रश्न मार्गी नाही लावला. ना कर्जमाफी केली आणि ना एक रूपयात पीक विमा भरला आणि म्हणतो अमुक केलं, तमुक केलं., अरे मारायच्या पलिकडे काय दिलं. त्या गुर्मीत नाही राहायचो. सरकार कुणाचंही येऊ दे हा पठ्ठ्या उभा आहे. तुम्हाला गुडघ्यावर टेकवणारच, तुम्हाला सोडणार नाही,असा इशारा जरांगेंनी दिला.
advertisement
मनोज जरांगे पुढे म्हणाले, मी स्पष्ठ सांगूनही सांगून देखील अनेकांमध्ये संभ्रम आहे. राजकारण आणि मतदान असा संभ्रम नकोच म्हणून कुणाच्या मतांवर चालू नका. माझेही ऐकू नका. मतदानाचा सन्मान तुमच्या हातात आहे. त्यामुळे कुणाला पाडायचे त्याला पाडा, ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याला सोडू नका,असे आवाहन जरांगे पाटलांनी केले. तसेच मतदान कुणाला करायचे, कुणाला पाडायचे आणि कुणाकडून बॉण्ड आणि व्हिडिओ घ्यायचा ते आता स्वतः मराठा समाजाने ठरवावे. तुम्हाला कोण मदत करेल? कोण आपल्या आरक्षणासाठी काम करेल? अशा लोकांच्या पाठीशी राहावे आणि हा निर्णय स्वतः समाजाने ठरवावे, असे जरांगे यांनी सांगितलंय.
advertisement
राजकारणाच्या तयारी पेक्षा फुकट कुणाला मोठे करण्या पेक्षा आंदोलनाच्या तयारीला लागू. प्रचार सभेला प्रचाराला जाऊ नका.पण मतदान मात्र सर्वांनी करावे. ज्याला जे करायचे ते करा पण आरक्षणासाठी ज्याने त्रास दिला त्याला सोडायचे नाही, आता पूर्ण कारभार मराठा समाजाच्या हातात दिला आहे,असे देखील जरांगेंनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाडापाडीवरून नरमले आणि फडणवीसांवर घसरले, 'तुम्हाला गुडघ्यावर..'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement