सरपंचाचे फोटो पाहून मनोज जरांगेंचं रक्त खवळलं, डोळ्यात आग, संयम सुटला, धनंजय मुंडेंना म्हणाले...

Last Updated:

Manoj Jarange: धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. या हरामखोरांना आता सोडता कामा नये. कारण ही टोळी धनंजय मुंडे यांनीच पोसली होती, असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.

मनोज जरांगे पाटील- वाल्मिक कराड-धनंजय मुंडे
मनोज जरांगे पाटील- वाल्मिक कराड-धनंजय मुंडे
छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आरोपींचे फोटो दोषारोपत्राच्या माध्यमातून समोर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे अतिशय आक्रमक झालेले आहेत. एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात बदल्याची आग घेऊन मनोज जरांगे यांनी वाल्मिक गँगचा सुपडासाफ करण्याची प्रतिज्ञा केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. या हरामखोरांना आता सोडता कामा नये. कारण ही टोळी धनंजय मुंडे यांनीच पोसली होती. या संपूर्ण घटनेमागे धनंजय मुंडेच आहे, धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करून जेलमध्ये टाकावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.

संतोष देशमुख यांना मारतानाचे फोटो पाहून जरांगे पाटील यांच्या तीव्र भावना

advertisement
जातीसाठी आता एक व्हावंच लागेल. धनंजय मुंडे यांनी पोसलेल्या टोळीला आपल्याला संपवावंच लागेल. गाठ माझ्याशी आहे, मी यांना सोडणार नाही. मुंडे यांच्या टोळीला चौकात 200 गोळ्या झाडून, फासावर लटकवले पाहिजे. तुम्ही आहातच किती? तुम्ही फक्त मूठभर आहात, तुम्हाला गल्ली गल्लीत कुत्र्यासारखे मारू... असे जरांगे म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले-धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा

advertisement
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना सहआरोपी केले पाहिजे. तसेच त्यांना जेलमध्ये टाकून संबंधित आरोपींना सरकारने लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल, यासाठी पावले उचलली पाहिजेत, असेही जरांगे म्हणाले.

देशमुख यांना मारतानाचे फोटो पाहून कुणाचंही रक्त खवळेल

वाल्मिक कराड हाच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने दोषारोपत्रात म्हटल्यानंतर सोमवारी सायंकाळी देशमुख यांना मारतानाचे फोटो समोर आले. जे फोटो पाहून कुणाच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतील, तळपायाची आग मस्तकात जाईल. आवादा कंपनीच्या खंडणीतूनच देशमुख यांचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर खंडणीसाठी वाल्मिकने फोन केल्याचे कॉल रेकॉर्डिंगही पोलीस तपासांत समोर आले आहे.
advertisement
संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले. परंतु या प्रकरणाचे मूळ आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आहे. देशमुख यांनी गावातील कंपनीने कुणालाही खंडणी देऊ नये, उलट रोजगार यावा यासाठी प्रयत्न केले. हीच गोष्ट वाल्मिक गँगला खटकली. त्यांनी देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरपंचाचे फोटो पाहून मनोज जरांगेंचं रक्त खवळलं, डोळ्यात आग, संयम सुटला, धनंजय मुंडेंना म्हणाले...
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement