Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळेल कुणबी प्रमाणपत्र, कसा आणि कुठे करायचा अर्ज? संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kunbi Certificate: आता अवघ्या 21 ते 45 दिवसांत कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. तालुका स्तरावर अर्ज करण्यापासून ते जात प्रमामणपत्र मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले. यामध्ये मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा बांधव सहभागी झाले होते. तेव्हा जरांगे यांनी मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीस मान्यता दिली. आता याच हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र कसं काढता येईल? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.
गावपातळीवर समिती गठित
हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने गाव पातळीवर समिती गठित केली आहे. या समितीमध्ये समिती सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. या समितीच्या अहवालावर आधारित सक्षम प्राधिकरणाकडून कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल.
advertisement
प्रकिया नेमकी कशी असेल?
कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागेल.
उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे जात प्रमाणपत्र अर्ज करावा लागणार आहे.
हा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे गेल्यानंतर ही समिती त्याची तपासणी करेल आणि गाव पातळीवर गठीत केलेल्या समितीकडे चौकशीसाठी पाठवेल.
गाव पातळीवर गठीत केलेली समिती अर्जदाराची पोलिस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठवेल.
advertisement
गाव पातळीवरील समिती जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखी कागदपत्रे तपासली जातील.
तालुकास्तरीय समिती गाव पातळीवर गठीत समितीने पाठवलेला अहवालाचे अवलोकन करेल.
पुढे तालुका समिती अर्जावर शिफारस करेल आणि त्यानुसार अर्जावर विहित कार्यपद्धतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल.
21 ते 45 दिवसांच्या कालावधीत कुणबी प्रमाणपत्र मिळेल.
advertisement
कोणती कागदपत्रे आवश्यक?
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणारा अर्जदार मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असावा. जमीनीचा मालक असल्याचा पुरावा संबंधिताला सादर करावा लागेल.
ज्या अर्जदारांकडे पुरावा नाही त्यांना 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वीचे त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावा लागेल
अर्जदाराने त्यांच्या कुळातील व्यक्तींना कोणते प्रमाणपत्र मिळाले आणि त्यांच्या नातेवाईकांचे कुणबी असल्याचे संबधीत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
advertisement
याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 12, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळेल कुणबी प्रमाणपत्र, कसा आणि कुठे करायचा अर्ज? संपूर्ण माहिती