आडनाव वाघ असून सरकारच्या शेळ्या राखतेस? नादाला लागली तर तुझं गबाळ उचकेन, जरांगेंचा चित्रा वाघ यांना इशारा

Last Updated:

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा करून भाजप नेते त्यांच्यावर टीका करीत आहेत.

चित्रा वाघ आणि मनोज जरांगे पाटील
चित्रा वाघ आणि मनोज जरांगे पाटील
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा करीत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये आमच्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, आमच्या आई बहि‍णींच्या पायाला अजूनही जखमा आहेत, त्यावेळी तू कुठे गेली होतीस? आडनाव वाघ असून सरकारच्या शेळ्या का राखतेस? असा सवाल करीत माझ्या नादाला लागतीस तर तुझं गबाळ उचकेन (प्रकरणे बाहेर काढेन) असा इशाराच जरांगे यांनी चित्रा वाघ यांना दिला.
मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा बीडच्या मांजरसुब्यात पार पडली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा करून भाजप नेते त्यांच्यावर टीका करीत आहेत. चित्रा वाघ यांनीही समाज माध्यमांवरून जरांगे पाटील यांना सुनावले होते. वाघ यांच्या टीकेला जरांगे पाटील यांनी सणसणीत उत्तर दिले.

नादाला लागली तर सगळं गचपान बाहेर काढीन, आडनाव वाघ असून सरकारच्या शेळ्या राखतेस?

advertisement
मी फडणवीस यांच्या आईवर काहीही बोललेलो नाही. पण काही बोललो असेल तर शब्द मागे घेतो, असे स्पष्ट करीत तुमच्या आईप्रमाणे आमच्याही आईला तोला. आरक्षण दिले तर आम्हाला कुणावरही काही बोलायची गरज पडणार नाही. कोण वाघिण माझ्यावर बोलते. आडनाव वाघ असून सरकारच्या शेळ्या राखतेस? आमच्या आया बहिणी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, तेव्हा कुठे झोपली होतीस? तू माझ्या नादाला लागू नको. नादाला लागली तर सगळं गचपान बाहेर काढीन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
advertisement
फडणवीस यांच्या आईबद्दल बोललेलो तुम्ही समाज माध्यमांवर पोस्ट केले. आमची आईही आम्हाला प्रिय आहे. आमच्या आई बहिणीला मारहाण झाली त्यावेळी तू समाज माध्यमांवर का टाकले नाहीस? त्यावेळी तुला का लागलं नाही? अशा शब्दात जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.

आरक्षण द्यायचं नाही म्हणून आईचा सहारा

फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे. आम्हाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना तू बढती दिलीस. तू आम्हाला आरक्षण दे, आम्ही तुझ्या आईची पूजा करू, तू बाकीचे चाळे बंद कर, तू एवढा रडका आहे हे आम्हाला माहिती नव्हते. देवेंद्र फडणवीसला मराठ्यांना आरक्षण देण्याचा कंटाळा आलाय. म्हणून त्याने सोशल मीडियावरून आईचा सहारा घेतलाय, असेही जरांगे म्हणाले.
advertisement

फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही

कुणालाही आम्ही किंमत देत नाही. त्यांना आम्ही विरोधक मानत नाही. त्यांनी एवढीच ताकद स्वतःच्या समाजासाठी वापरावी, असे लक्ष्मण हाके यांच्या टीकेवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले. फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, आईच्या आडून आणि पद टिकविण्यासाठी फडणवीस यांनी राजकारण करू नये, असेही जरांगे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आडनाव वाघ असून सरकारच्या शेळ्या राखतेस? नादाला लागली तर तुझं गबाळ उचकेन, जरांगेंचा चित्रा वाघ यांना इशारा
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement