Marathi : 'हिंदीत बोला...' साताऱ्यातच मराठीचे हाल, बँक कर्मचाऱ्याचा उर्मटपणा, पाहा व्हिडीओ

Last Updated:

Marathi Issue : मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या परिसरात बिगर मराठी भाषिकांकडून मराठी भाषेची आणि मराठी माणसाची अवहेलना होत असताना आता साताऱ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
सातारा: मागील काही महिन्यांपासून मराठी भाषा आणि मराठी माणसाचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या परिसरात बिगर मराठी भाषिकांकडून मराठी भाषेची आणि मराठी माणसाची अवहेलना होत असताना आता साताऱ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेतील अधिकाऱ्याने मराठी भाषिक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना हिंदी शिकून या असे म्हणत उर्मटपणा दाखवला आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला जात असल्याचे समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
advertisement
व्हिडीओतील राहुल शेडगे या तरुणाने केलेल्या दाव्यानुसार, या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत बहुंताश ग्राहक हे ज्येष्ठ नागरीक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना हिंदी भाषा येत नाही. त्यांना मराठी भाषा बोलता येते आणि समजते. पण या बँकेतील कर्मचारी या मराठी भाषिक ग्राहकांना हिंदीतच बोलण्याचा हट्टाहास करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसल्याने हिंदीत संभाषण करण्याची सूचना या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.
advertisement

आम्हाला तुमची गरज नाही, हिंदी शिका...

राहुल शेडगे यांनी बँकेतून व्हिडीओ शूट केला असून धक्कादायक आरोप केले आहेत. राहुल शेडगे यांनी सांगितले की, हिंदीच्या हट्टहासाबाबत जाब विचारले असता त्याने तुम्ही हिंदी शिकून या, आम्हाला तुमची गरज नाही असं उलट उत्तर दिले. या व्हिडीओवर सोशल मीडियातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi : 'हिंदीत बोला...' साताऱ्यातच मराठीचे हाल, बँक कर्मचाऱ्याचा उर्मटपणा, पाहा व्हिडीओ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement