पती, पत्नी और वो! नागपूरच्या पोट्टीचा स्वत:च्या घरातच कांड, तपासानंतर पोलीसही शॉक
- Published by:Shreyas
Last Updated:
घर का भेदी लंका ढाये, या म्हणीला नागपूरच्या एका पत्नीने खरं ठरवलं आहे. या पत्नीने लग्नाआधीच्या मित्राला टीप देऊन स्वत:च्याच घरात 14 लाखांची चोरी करवून घेतली, मात्र आता या पत्नीला जेलची हवा खावी लागत आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर, 31 जुलै : घर का भेदी लंका ढाये, या म्हणीला नागपूरच्या एका पत्नीने खरं ठरवलं आहे. या पत्नीने लग्नाआधीच्या मित्राला टीप देऊन स्वत:च्याच घरात 14 लाखांची चोरी करवून घेतली, मात्र आता या पत्नीला जेलची हवा खावी लागत आहे. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्या घरामध्ये ही चोरी झाली आहे, यामध्ये सोनं-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला.
advertisement
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि घरातील सीसीटीव्ही तपासले आणि हळूहळू चोरीचं गूढ उकलत गेलं. पोलिसांना सुरूवातीला फिर्यादीच्या पत्नीवर संशय होता, पण त्यांना पुरावा मिळत नव्हता. पोलिसांनी घटनेचा बारीक तपास केला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला.
घटनेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला बाहेर घेऊन गेली. प्लाननुसार चोराला म्हणजेच पत्नीच्या आधीच्या प्रियकराला घरात कुठे काय ठेवण्यात आलं आहे, याची सगळी माहिती देण्यात आली होती. यानंतर प्लाननुसार पती-पत्नी बाहेर गेल्यानंतर तो घरात शिरला आणि काही वेळात ठरल्या प्रमाणे त्याने मुद्देमाल लंपास केला. सीसीटीव्हीमध्ये तो छत्री घेऊन जाताना दिसला आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
advertisement
एक्स-बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीच्या घरात चोरी, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास, नागपूरच्या पोरीचा प्रताप pic.twitter.com/SWb2lMWdLl
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2023
रामटेक तालुक्यातील त्याच्या घरी पोलीस पोहोचले आणि घराची झडती घेतली असता सोन्या-चांदीचे दागिने मिळाले, पण तो रोख रक्कम घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी एक एक खुलासा करत फिर्यादीच्या पत्नीसह एकाला अटक केली. पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली मात्र चोरी करणारा अजूनही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
advertisement
या महिलेच्या पतीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता तेव्हापासून ती पतीकडे दुर्लक्ष करत होती. पत्नीला पतीपासून दूर व्हायचं होतं पण पती त्यासाठी तयार नव्हता, म्हणून आपल्या जुन्या मित्राच्या साहाय्याने तिने हा प्लान आखला आणि स्वत:च्याच घरात चोरी करून घेतली.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
July 31, 2023 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पती, पत्नी और वो! नागपूरच्या पोट्टीचा स्वत:च्या घरातच कांड, तपासानंतर पोलीसही शॉक


