दोन भावांचं मनोमिलन, फडणवीस दिलेला शब्द पूर्ण करणार, सातारा जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळणार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Satara Politics: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस त्यांचा शब्द पूर्ण करणार असल्याचा संदेश गोरे यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
सचिन जाधव, सातारा: मंत्री जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधक.. दोघे एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूकही लढले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरे भावांमध्ये समझोता घडवून आणला. एकाला मंत्री आणि दुसऱ्याला आमदार करू, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस त्यांचा शब्द पूर्ण करणार असल्याचा संदेश गोरे यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आत्ताचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयात मोठा वाटा त्यांचे बंधू भाजपचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता. या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवून दोन्ही भावांना एकत्र आणले.
advertisement
शेखर गोरे यांना लवकरच जबाबदारी
त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मदत झाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. त्यादरम्यान शेखर गोरे यांना आमदार करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर शेखर गोरे यांना ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे.
जबाबदारीने सांगतो- आमदार होणार, फेब्रावारीपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल
advertisement
याबाबत स्वतः शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केला आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, "सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार हे मी जबाबदारीने सांगतो. माझ्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या फेब्रुवारीच्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल".
advertisement
"कार्यक्रमाला येताना मला अनेक लोक विचारित होते की जयकुमार गोरे आमदार झाले? आपले काय? आपण कधी आमदार होणार? मी कार्यकर्त्यांना जबाबदारीने सांगतो, येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. त्यानंतर महिन्याभरात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची निवडणूक होईल. या निवडणुकीत आपण नक्की आमदार होऊ", असे शेखर गोरे म्हणाले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 28, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन भावांचं मनोमिलन, फडणवीस दिलेला शब्द पूर्ण करणार, सातारा जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळणार