संभाजी भिडेंनी तिरंग्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू यांचा इशारा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
तिरंगा ध्वज ऐवजी भगवा झेंडा फडकावा असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संभाजी भिडे यांना इशारा दिला.
संजय शेंडे, अमरावती, 12 ऑगस्ट : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज ऐवजी भगवा झेंडा फडकावा असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संभाजी भिडे यांना इशारा दिला. भगव्याचा सहारा घेऊन तिरंगाला डीवचण्याचा प्रयत्न करू नये नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागेल असा इशारा दिला.
अमरावतीत बच्चू कडू यांच्याकडून सायकल तिरंगा सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. अमरावती शहर ते यावली शहीद यांच्या घरापर्यंत सायकल तिरंगा सन्मान रॅली काढणार आहेत. संभाजी भिडे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करू नये. त्यामुळे असंख्य हिंदूवर संशयाची सुई निर्माण होईल असंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
advertisement
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वजासोबतच भगवा ध्वज फडकवू असं कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यामुळे अमरावती शहरात बच्चू कडू व संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे अमरावती येथे आले असता त्यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. संभाजी भिडे चे कार्यकर्ते मात्र भगवा ध्वज घेऊन रॅली काढू असं म्हटल्याने या वादात आणखी ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2023 5:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजी भिडेंनी तिरंग्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू यांचा इशारा


