Modak Flavors: बाप्पासाठी निवडा 21 फ्लेवर्सचे मोदक, रंगीबेरंगी मोदकांनी नैवेद्य दिसेल खास, ‎छ. संभाजीनगरमध्ये इथं करा खरेदी

Last Updated:

Modak Flavors: पूर्वी तळणीचे किंवा उकडीचे मोदक प्रचिलत होते. पण, आता वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक उपलब्ध झाले आहेत.

+
Modak

Modak Flavors: बाप्पासाठी निवडा 21 फ्लेवर्सचे मोदक, रंगीबेरंगी मोदकांनी नैवेद्य दिसेल खास, ‎छ. संभाजीनगरमध्ये इथं करा खरेदी

छत्रपती संभाजीनगर : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली जात आहे. बाप्पाला त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य ठेवला जात आहे. 'मोदक' हा खाद्यपदार्थ बाप्पाला अतिशय प्रिय असल्याचं म्हटलं जातं. म्हणून बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांचा समावेश असतोच. घरातील महिलामंडळ बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करतात. पूर्वी तळणीचे किंवा उकडीचे मोदक प्रचिलत होते. पण, आता वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक उपलब्ध झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका दुकानात तर तब्बल 21 प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
‎छत्रपती संभाजीनगर शहरातील मोंढा नका या ठिकाणी असलेल्या 'नम्रता स्वीट' या दुकानात तब्बल 21 फ्लेवरचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये काही युनिक फ्लेवर्सचा देखील समावेश आहे. दरवर्षी या ठिकाणी 18 प्रकारचे मोदक असतात. पण, यावर्षी त्यांनी 21 प्रकारचे मोदक हे तयार केलेले आहेत. या मोदकांची किंमत 700 रुपये प्रति किलो ते 1800 रुपये प्रति किलो दरम्यान आहे.
advertisement
‎मोदकांचे फ्लेवर्स 
मावा केशर मोदक, मथुरा मोदक, मावा ब्लॅक करंट मोदक, ऑरेंज मोदक, गुलकंद मोदक, खोबरा मोदक, चॉकलेट मोदक, पारंपरिक तळणीचे मोदक, पायनापल मोदक, मोतीचूर मोदक, काजू पिस्ता मोदक, काजू स्ट्रॉबेरी मोदक, स्पेशल कॉफी मोदक, स्पेशल बदाम मोदक, कॉफी किवी मोदक, काजू रोज मोदक, मावा टू इन वन मोदक, असे वेगवेगळ्या प्रकारचे या दुकानात उपलब्ध आहेत.
advertisement
‎याशिवाय, या दुकानात मोठ्या आकाराचे मोदक देखील विक्रीसाठी आहेत. मिक्स फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेल्या या एका मोदकाचं वजन अर्धा किलो आहे. सुंदर असे सजवलेले मोदक तुम्ही बापा समोर ठेवू शकता. या दुकानात 21 मोदकांचं प्लॅटर देखील उपलब्ध आहे. एका प्लॅटरमध्ये 21 फ्लेवर्सचे मोदक दिले जातात. ‎
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Modak Flavors: बाप्पासाठी निवडा 21 फ्लेवर्सचे मोदक, रंगीबेरंगी मोदकांनी नैवेद्य दिसेल खास, ‎छ. संभाजीनगरमध्ये इथं करा खरेदी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement