advertisement

Dream11 आणि Rummy circle च्या नादात पोलीस कर्मचारी बनला चोर, आपल्याच विभागात केलं कांड, बीडमधील घटना

Last Updated:

सुतार हा सहायक फौजदार असून पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता.

News18
News18
सुरेश जाधव,प्रतिनिधी
बीड : झटपट श्रीमंत होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मागील काही वर्षांपासून ड्रीम११ आणि रम्मी एपवर पैसे कमावण्यासाठी अनेक जण आपलं नशीब आजमावतात पण हाती काहीच लागत नाही. बीडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने ड्रीम११ आणि रम्मी सर्कलच्या नादापायी कर्जबाजारी झाला. कर्जबाजारी झाल्यानंतर त्याने आपल्याच विभागात चोरीचा धडाका लावला, अखेरीस हा चोर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. अमित मधुकर सुतार असं या चोर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर स्वराज कोंडीराम बोबडे (२६, रा. अंबिका नगर, बीड) आणि हितोपदेश गणेश वडमारे (३०, रा. अंकुशनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आरोपी अमित सुतारला मदत केली होती.
अमित सुतार हा फॅन्टसी एप  ड्रीम 11 आणि  रम्मी सर्कल एपच्या आहारी गेला होता. या एपमध्ये त्याने पैसे गुंतवले होते. पण त्याला या खेळाचा इतका नाद लागला की त्याने स्वत: जवळचे पैसे संपवले. आता स्वत: जवळचे पैसे संपल्यानंतर त्याने लोकांकडून कर्ज घेतलं. पण कर्ज परतफेड करता येत नसल्यामुले त्याने चोरीचा प्लॅन आखला.   वायरलेस विभागात डिसेंबर 2024 मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातून 12 व्होल्टच्या 58 बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी चोरल्या. पोलिसांनी त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरल्या
सुतार हा सहायक फौजदार असून पोलीस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता. 24 डिसेंबर 2024 रोजी सुतार याने इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या 12 बॅटऱ्या चोरल्या. त्याच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अधिक तपास केल्यावर त्याच्याकडे तब्बल 18 बॅटऱ्या निघाल्या. आता सात दुचाकी चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पोलिसाचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dream11 आणि Rummy circle च्या नादात पोलीस कर्मचारी बनला चोर, आपल्याच विभागात केलं कांड, बीडमधील घटना
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement