मराठवाड्यात पूर परिस्थिती, विद्यार्थी संकटात, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला, जयंत पाटील यांची मागणी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा आणि मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
मुंबई : येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा आणि मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे, असे जयंत पाटील यांनी अधोरेखित केले.
या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठवाड्यात पूर परिस्थिती, विद्यार्थी संकटात, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला, जयंत पाटील यांची मागणी