PAK vs BAN : टीम इंडियाला AK 47 दाखवणाऱ्या खेळाडूची भर मैदानात अब्रु गेली,दुबळ्या बांग्लादेशसमोर लाजीरवाणी कामगिरी

Last Updated:

पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने भारताविरूद्ध अर्धशतक ठोकून AK 47 सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशननंतर मोठा वाद पेटला होता. पण आज बांग्लादेशविरूद्ध खेळताना त्यांची लाज गेली आहे

sahibzada farhan
sahibzada farhan
Pakistan vs Bangladesh Super 4 : पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने भारताविरूद्ध अर्धशतक ठोकून AK 47 सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशननंतर मोठा वाद पेटला होता. पण आज बांग्लादेशविरूद्ध खेळताना त्यांची लाज गेली आहे. कारण अवघ्या 4 धावांवर बाद झाला आहे.त्यामुळे टीम इंडियाचा AK 47 दाखवणाऱ्या साहिबजादा फरहानची भर मैदानात अब्रु गेली आहे.विशेष म्हणजे त्याच्या पाठोपाठ सॅम अय्युब शुन्यावर बाद झाला आहे.त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे.
खरं तर टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यानंतर फायनल मध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या टीमचा निकाल आज लागणार आहेत. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातून जिंकणारा संघ भारताची फायनलमध्ये भिडणार आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने हा महत्वाचा सामना आहे. या महत्वाच्या सामन्यातच पाकिस्तानची हालत खराब झाली आहे.
त्याचं झालं असं की पाकिस्तानकडून फखर जमान आणि साहिबजादा फरहान सलामीला उतरले होते.यावेळी साहिबजादा मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण बांग्लादेशविरूद्ध सामन्यात त्याचा लाज गेली आहे. कारण अवघ्या 4 धावा करून तो बाद झाला आहे. त्याच्यानंतर सॅम अयुब मैदानात उतरला होता.त्याला अद्याप आशिया कपमध्ये लय सापडली नाही आहे. तो आजच्या सामन्यात मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. पण आज तो देखील शुन्यावर बाद झाला. विशेष म्हणजे आशिया कपच्या पाच सामन्यापैकी चार सामन्यात सॅम अयुब शुन्यावर बाद झाला आहे.फक्त भारताविरूद्ध त्याने काही धावा केल्या आहेत.
advertisement
या सामन्यात बांग्लादेशच्या बॉलर्सनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत पहिल्या तीन ओव्हरमध्ये पाकिस्तानला मोठ्या धावा करूच दिल्या नाहीयेत.त्यात दोन विकेट देखील काढल्या होत्या.त्यामुळे पाकिस्तान दबावात खेळते आहे.पाकिस्तानच्या 4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 15 धावा केल्या आहेत.

बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार 

पाकिस्तानी क्रिकेटपटू हरिस रौफ (Haris Rauf) आणि साहिबजादा फरहान (Sahibzada Farhan) यांच्या अश्लील आणि चिथावणीखोर वर्तनानंतर भारताने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.बीसीसीआयने बुधवारी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि आयसीसीला ई-मेल मिळाला आहे. जर साहिबजादा आणि रौफ यांनी लेखी स्वरूपात आरोप नाकारले तर त्यांना आयसीसी एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागू शकतं. अशातच आता दुसरीकडे पाकिस्ताने देखील बीसीसीआयच्या कारवाईला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : टीम इंडियाला AK 47 दाखवणाऱ्या खेळाडूची भर मैदानात अब्रु गेली,दुबळ्या बांग्लादेशसमोर लाजीरवाणी कामगिरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement