Mumbai Blast 2006 Case : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्धवस्त झालेल्या तळावर शिजला होता कट, 11 मिनिटांत मुंबई हादरवणाऱ्या कटाचा घटनाक्रम
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Blast 2006 Case : सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या घटनेने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली होती.
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई 1993 नंतर पु्न्हा एकदा 2006 मध्ये साखळी स्फोटाने हादरली. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल 11 जुलै रोजी जवळपास 209 प्रवाशांसाठी डेथलाइन ठरली होती. आज मुंबई हायकोर्टाने या बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या घटनेने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली होती. तपास यंत्रणांनी हा स्फोटामागे एक घटनाक्रम सांगितला होता. हा घटनाक्रम कसा होता, स्फोटाची थेरी काय?
अतिशय योजनाबद्ध पद्धतीने मुंबई दहशतवादी हल्ला करण्यात आला. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय हवाई दलाने बहावलपूरमधील दहशतवाद तळावर हल्ला करत उद्धवस्त केले. याच बहावलपूरमध्ये मुंबईतील साखळी ब़़ॉम्बस्फोटचा कट आखण्यात आला होता. मुंबई पोलीस, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकांनी या घटनेचा तपास केला. या तपासात हल्ल्याचा कट समोर आला.
>> मुंबईतील 7/11 दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम...
advertisement
मार्च 2006 : बहावलपूर येथे लष्कर-ए-तोय्यबाचा सूत्रधार अझम चिमा याच्या हवेलीत कटाचा डाव शिजला. त्यात ‘सिमी’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चे नेते यांना सामील करून दोन मोड्युल्स ठरविण्यात आली. 50 जणांना बहावलपूरला प्रशिक्षणासाठी पाठविले, तेथे त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले.
25 जून 2006 : ‘लष्कर’ने बाँबरना भारतात घुसवले. नेपाळ सीमेमार्गे कमाल अन्सारीने दोघा पाकिस्तानींना, अब्दुल माजीदने पाच जणांना बांगलादेश मार्गे आणि चौघांना कच्छमार्गे भारतात आणले.
advertisement
27 जून 2006 : मुंबईच्या उपनगरांत चार ठिकाणी 11 जणांना पेरण्यात आले.
8 ते 10 जून 2006 : एहसान उल्लाहने 15 ते 20 किलो आरडीएक्स पाकिस्तानातून कांडलामार्गे भारतात आणले. अमोनिअम नायट्रेट मुंबईत खरेदी केले. सांताक्रूझ भागातील दोन ठिकाणांवरून 8 प्रेशर कुकर खरेदी केले.
9 ते 10 जुलै 2006 : गोवंडीतील महम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार केले.
advertisement
कट आखला अन् घटनाक्रम
11 जुलै 2006 - आरोपी वेगवेगळ्या टॅक्सीमधून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लोकल ट्रेनमध्ये शिरत स्फोटके असलेल्या बॅग, पिशव्या ठेवल्या. दहशतवाद्यांनी काही मिनिटांच्या अंतरावर स्फोटाची वेळ ठरवली होती. या साखळी बॉम्बस्फोटातील पहिला बॉम्बस्फोट 6.24 मिनिटांनी माटुंगा स्थानकाजवळ लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये झाला. त्यानंतर पुढील 11 मिनिटात सहा ठिकाणी वेगवेगळे ब्लास्ट झाले. भाईंदर, सांताक्रूझ, माहीम, वांद्रे, जोगेश्वरी, बोरीवली, खार रोड या स्थानकांजवळ फर्स्ट क्लासमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या. ऐन गर्दीच्या वेळी हे स्फोट झाल्याने मृत आणि जखमींची संख्या मोठी होती.
advertisement
जुलै ते ऑक्टोबर 2006 - या कालावधीत मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) ‘सिमी’शी संबंधित 13 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली.
30 नोव्हेंबर 2006 - ‘एटीएस’तर्फे अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.
29 सप्टेंबर 2006 - प्रेशर कुकरमध्ये स्फोटके ठेवून ते वेगवेगळ्या लोकलच्या डब्यांत ठेवण्याचे काम ‘लष्कर ए तैयबा’च्या सदस्यांनी केले, असा दावा मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांनी केला.
advertisement
जून 2007- या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली.
सप्टेंबर 2008 - इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) ऑपरेटिव्हला अटक
एप्रिल 2010 - सर्वोच्च न्यायालयाने कमाल अन्सारीचा अर्ज फेटाळत खटल्याची सुनावणी सुरू करण्याचा आदेश दिला
13 फेब्रुवारी 2010 - आरोपी फाहिम अन्सारी याचे वकील शाहीद आझमी यांची मुंबईतील कार्यालयात अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
advertisement
30 ऑगस्ट 2013 - इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने साखळी बॉम्ब स्फोटाबद्दल अटक केली. 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचे उट्टे काढण्यासाठी 2006 मध्ये साखळी स्फोट घडविल्याचे यासीनने सांगितले.
त्यामुळे ‘एटीएस’ने अटक केलेल्या 13 जणांबाबत प्रश्न निर्माण झाला.
20 ऑगस्ट 2014 - सरकारी पक्षाने 200 साक्षीदारांच्या आणि बचाव पक्षाने 40 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. खटल्याचे कामकाज आठ वर्षांनंतर संपले. खास न्यायाधीश यतीन शिंदे यांच्यासमोर कामकाज चालले
11 सप्टेंबर 2015 - मोक्का विशेष न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले.
30 सप्टेंबर 2015 - पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर सातांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Blast 2006 Case : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्धवस्त झालेल्या तळावर शिजला होता कट, 11 मिनिटांत मुंबई हादरवणाऱ्या कटाचा घटनाक्रम