Mumbai Crime : दिवसाढवळ्या मुंबई हादरली! भांडणाच्या रागात भररस्त्यात चाकूने सपासप वार...घटनेचा थरारक VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत भांडणाचा राग आल्याने एकाने तिघांवर भररस्त्यात दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे.या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत भांडणाचा राग आल्याने एकाने तिघांवर भररस्त्यात दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे.या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत.या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, घाटकोपरच्या पारशीवाडी विभागात ही घटना घडली आहे.या घटनेत एका व्यक्तीच कोणत्यातरी कारणावरून पिडीत व्यक्तींसोबत भांडण झालं होतं. या भांडणानंतर पिडीत व्यक्ती आरोपीची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात होते.या दरम्यान आरोपीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.
सूरूवातीला आरोपीने चाकूचा धाक दाखवत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण पीडीत व्यक्ती पोलीस ठाण्यात जाण्यावर ठाम होते.त्यामुळे आरोपीने थेट दोघांवर चाकूने सपासप हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले होते. अखिलेश राजभर आणि रवी दीक्षित असे या जखमींचे नाव होते.ही संपूर्ण घटना भररस्त्यात घडली होती.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
याप्रकरणात अखिलेश राजभर आणि रवी दीक्षित यांनी आम्ही पोलिसांना तक्रार करणारच असे सांगितले असता त्याने आमच्यावर हल्ला करून जखमी केल्याची माहिती पोलिसांना दिली होतू.त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.मोहम्मद अली शेख असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेने खळबळ माजली आहे.
advertisement
मुंबईत अशा घटना क्वचितच घडत असतात. त्यातल्या त्यात ही दिवसाढवळ्या घडल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे मुंबई पोलिसांचा दरारा संपला की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Crime : दिवसाढवळ्या मुंबई हादरली! भांडणाच्या रागात भररस्त्यात चाकूने सपासप वार...घटनेचा थरारक VIDEO