पुण्याचा नगराध्यक्ष ठरला, महिला की पुरुष कोणाचं पारडं जड? बारामती ते मंचर संपूर्ण यादी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बारामती , तळेगाव, इंदापूर, आळंदी हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायती आहेत
पुणे : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षणाची सोडत निघाली. यामध्ये कोणत्या नगर पंचायत किंवी नगर परिषदेत कोणत्या प्रवर्गासाठी जागा सुटली आहे, याची माहिती आता समोर आली आहे. या माहितीनंतर आता प्रत्येक नगर पंचायती आणि नगर परिषदांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या आरक्षणावरच राजकीय समीकरणं अवलंबून असतात. बारामती , तळेगाव, इंदापूर, आळंदी हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायती आहेत.
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण
खुला प्रवर्ग
- बारामती
- तळेगाव
- सासवड
- जेजुरी
- इंदापूर
- आळंदी
- भोर
- राजगुरुनगर
- चाकण ( खुला महिला )
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- दौंड - नगरपरिषद
- शिरूर - नगरपरिषद
- जुन्नर - नगरपरिषद
अनुसूचित जाती
- लोणावळा नगरपरिषद
- फुरसुंगी उरुळी देवाची
नगरपंचायत विभाग
- वडगाव नगरपंचायत ( खुला महिला )
- देहू नगरपंचायत ( खुला महिला )
अनुसूचित जाती
advertisement
- माळेगाव बुद्रुक नगरपंचायत ( तालुका बारामती )
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
- मंचर नगरपंचायत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांवरील आरक्षणाची सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. न बीड जिल्ह्यातील आरक्षणही या सोडतीत निश्चित करण्यात आले.मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले असून, यामुळे आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मोठा संधी मिळणार आहे.
advertisement
147 नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी 74 जागा राखी त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7, मागासवर्ग प्रवरगास 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 06, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा नगराध्यक्ष ठरला, महिला की पुरुष कोणाचं पारडं जड? बारामती ते मंचर संपूर्ण यादी