Bollywood Movie: 2 तास 48 मिनिटांचा सिनेमा, बजेटपेक्षा 5 पट केली कमाई; दमदार कहाणी ठरली ब्लॉकबस्टर

Last Updated:
Bollywood Movie: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त कहाणी असलेले सिनेमे रिलीज होत असतात. असाच एक सिनेमा ज्याच्या दमदार कहाणीने प्रेक्षकांची मने जिंकली अन् बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली.
1/7
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त कहाणी असलेले सिनेमे रिलीज होत असतात. असाच एक सिनेमा ज्याच्या दमदार कहाणीने प्रेक्षकांची मने जिंकली अन् बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली. थिएटरही हाऊसफुल्ल झालेले.

advertisement
2/7
जबरदस्त थरार, कोर्टरूम ड्रामा आणि भावनिक कथा यांचं अनोखं मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त 40 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, पण त्याने तब्बल 216 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

3/7
आपण बोलत असलेला हा सुपरहिट सिनेमा आहे,'रुस्तम'. टिनू सुकेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही कमांडर रुस्तम पावरी यांची भूमिका साकारली आहे, तर इलियाना डिक्रूझ त्याच्या पत्नी सिंथियाची भूमिका करताना दिसते.

4/7
सुरुवातीला दोघांचं आयुष्य सुंदर दाखवलं जातं, पण एका धक्कादायक सत्यामुळे सगळं कोलमडून जातं. रुस्तमला समजतं की त्याची पत्नी त्याच्याच मित्र विक्रमसोबत नात्यात आहे. काही दिवसांतच विक्रमचा खून होतो, आणि सर्व बोटं रुस्तमकडे वळतात.

5/7
यानंतर सुरू होतो कोर्टरूममधला सस्पेन्सफुल खेळ. प्रत्येक साक्ष, प्रत्येक पुरावा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो. चित्रपटाच्या शेवटाकडे नेणारा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की थरकाप उडतो.

6/7
'रुस्तम' त्या काळात अक्षय कुमारच्या करिअरचा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. हा त्याचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आणि 2016 च्या पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाईचा विक्रमही त्याने केला. त्या वर्षीचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून 'रुस्तम' होता.

7/7
IMDb वर या चित्रपटाला 7 रेटिंग मिळालं आहे आणि आजही तो नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला कोर्टरूम ड्रामा, प्रेम, फसवणूक आणि न्याय यांचं उत्तम मिश्रण पाहायचं असेल, तर 'रुस्तम' नक्की पाहा.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement