किन्नर गुरू म्हणून ओळख असलेल्या ज्योती माँ उर्फ बाबू खान हिला मुंबई पोलिसांकडून अटक

Last Updated:

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी शहरांत अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मु्द्दा ऐरणीवर आहे.

बाबू खान अटक
बाबू खान अटक
मुंबई : महाराष्ट्राच्या विविध शहरात बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीरपणे वास्तव्याचा मुद्दा ऐरणीवर असताना मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईच्या गोवंडी भागातून किन्नर गुरू म्हणून ओळख असलेल्या बाबू खान हिला अटक केली. ज्योती माँ असे नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू खान हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुंबई उपनगरात तिची बरीच संपत्ती असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी शहरांत अवैधपणे वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिकांच्या मु्द्यांवरून भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रान उठवले आहे. विविध शहरांत जाऊन तेथील बांगलादेशींची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना ते पोलिसांना देत आहेत. ऐन दिवाळीत मुंबई पोलिसांनी गोवंडी भागातून किन्नर गुरू बाबू खान हिला अटक केली.
advertisement

बाबू खान हिची मुंबईत तब्बल २० घरे असल्याची माहिती

बाबू खान हिचे २०० पेक्षा जास्त चेले आहेत. मुंबईतील गोवंडीमध्ये ती वास्तव्याला आहे. बाबू खान हिची मुंबई उपनगरांत बऱ्याच ठिकाणी संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. तिची जवळपास मुंबईत २० घरे असल्याची माहिती आहे. बांगलादेशातून आलेल्या लोकांना राहायला ती जागा देत होती. स्थानिक नागरिकांनी याविषयीची माहिती गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानंतर माहिती पडताळून किन्नर माँ अर्थात बाबू खान हिला पोलिसांनी अटक केली. तिची विविध कागदपत्रे पडताळली असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
advertisement

बाबू खान हिचे बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणण्याचे रॅकेट

बांगलादेशी नागरिकांना अवैधपणे मुंबईत आणण्याचे रॅकेट बाबू खान उर्फ ज्योती माँ चालवायची. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद सीमेवरून ती लोकांना अवैधपणे भारतात आणत. संबंधिक लोकांना कोलकात्यात आठवडाभर थांबवून त्यांचा बनावट शाळेचा दाखला आणि जन्म दाखला बनवत. त्यानंतर त्यांना मुंबईत आणले जायते. गोवंडीच्या शिवाजीनगर भागात ज्योती माँ त्यांना आश्रय द्यायची.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
किन्नर गुरू म्हणून ओळख असलेल्या ज्योती माँ उर्फ बाबू खान हिला मुंबई पोलिसांकडून अटक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement