'सरकारमध्ये सगळ्यात ज्यूनिअर, कौटुंबिक नात्यात वेदना', पहिल्यांदाच अजित पवारांनी मन मोकळं केलं

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नागपुरातील चिंतन शिबीरात पक्षफुटीच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

News18
News18
आज (१९ सप्टेंबर) नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून चिंतन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या चिंतन शिबीरात अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित असणाऱ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. पक्षाचा विचार घेऊन कशाप्रकारे पुढे जायचं आहे, याबाबत देखील अजित पवारांनी मार्गदर्शन केलं.
याशिवाय अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना इशारा दिला आहे. पालकमंत्र्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस आपल्या जिल्ह्यात राहावं लागेल लोकांची कामं करावी लागतील, असंही अजित पवार म्हणाले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपले नियमित कामकाज सोडून इतर कामं केली, तर त्यांना मंत्रीपद सोडावं लागेल, असा थेट इशारा अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. यावेळी अजित पवार यांनी पक्षफुटीनंतर बदलेल्या परिस्थितीबाबत देखील मन मोकळं केलं आहे.
advertisement

अजित पवार नक्की काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, आपण भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये सर्वात ज्यूनिअर आहोत. अनेकजण मला हे पाऊल का टाकले? असा प्रश्न करतात. वैयक्तिक व कौटुंबिक नात्यांत वेदना का स्वीकारल्या? असे विचारतात. मी मनापासून सांगतो की, ही सत्ता किंवा पदासाठी उचललेली पाऊले नव्हती. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती व ठोस निर्णयाची गरज आहे. या माझ्या अंतःकरणाच्या हाकेने मी हा मार्ग निवडला. मी एखादी फाईल पुढे सरकवली आणि एखाद्या गावाला पाणी मिळालं, की मला समाधान मिळते."
advertisement
आपण जमीन आणि परवानगीचा विषय सोडवला अन् एखादा कारखाना सुरू झाला. त्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळाला की मला खऱ्या आनंदाची जाणीव होते. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मी स्वतःला एकच प्रश्न विचारतो की, आज मी किती लोकांचे जीवन सुधारले? हाच माझ्या यशाचा मापदंड आहे. हाच माझ्या राजकारणात असण्याचा मुख्य हेतू आहे, असे अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सरकारमध्ये सगळ्यात ज्यूनिअर, कौटुंबिक नात्यात वेदना', पहिल्यांदाच अजित पवारांनी मन मोकळं केलं
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement