Nagpur: APK फाईल उघडली की खात्यातले सगळे पैसे जायचे, २० कोटी जमवले, भामट्यांना बेड्या, हादरवणारी बातमी

Last Updated:

Nagpur Police: ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी व्हाट्सअप आणि टेलिग्रामचा वापर करत होते. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एपीके फाईलचा वापर करत होती.

ऑनलाईन फसवणूक टोळी
ऑनलाईन फसवणूक टोळी
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात २३ लोकांना ताब्यात घेतले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात ३५ गुन्हे दाखल आहेत. यातील दोघे आरोपी मध्यप्रदेशचे आहेत.
भारतातील २१ राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. २० कोटी पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार यात झाले आहे. यात ५४ लाख रूपये विविध बँक खात्यात गोठविण्यात पोलिसांना यश आले. ही टोळी व्हाट्सअप आणि टेलिग्रामचा वापर करत होते. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एपीके फाईलचा वापर करत होते. कोणीही एपीके फाईल उघडली की त्याच्या मोबाईल मधल्या बॅक अकाउंटची माहिती आणि ओटीपी फसवणूक करणाऱ्याकडे जात असे, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती. यातील मुख्य गुन्हेगाराकडे सगळे कंट्रोल राहत होते. १३ मोबाईल फोनवरून तो सगळे व्यवहार करत होता.
advertisement

२० कोटीच्या पुढे व्यवहार, राज्यात २५ तक्रारी, मास्टरमाईंड देशाच्या बाहेर असण्याची शक्यता

यामध्ये एक मोठा ग्रुप सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा तपास नागपूर पोलीस करीत आहेत. यामध्ये कशा प्रकारे पैशाचे व्यवहार होत होते हे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.गुन्ह्यातील दोन आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
advertisement
महाराष्ट्रात आतापर्यंत २५ तक्रारी झाल्या आहेत. यामध्ये हवाला आणि इतर प्रकार सुद्धा असण्याची पोलिसांना शंका आहे. जवळपास २० कोटीच्या पुढे व्यवहार झाले आहेत. याचा मास्टरमाईंड देशाच्या बाहेर असण्याची शक्यता आहे. त्यांनी हायर केलेले लोक हे काम करत होते. याचा मास्टरमाईंड शोधण्यासाठी सेंट्रल एजन्सीला सुद्धा या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे.
advertisement

नागपूर पोलिसांना गुन्हा उलगडण्यात कसे यश आले?

नागपूर शहर पोलिसात एक प्रकरण दाखल झाले होते. यात फिर्यादीने तक्रार दिली होती. बँक खात्यात वर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. त्या खात्यावर पैसे येत होते आणि जात होते. मात्र त्याच्याशी काहीही संबंध नसल्याने हे काय सुरू आहे हे कळत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनंतर तपास केला असता यामध्ये त्याच्या बँक खात्यात होत असलेल्या व्यवहारांमध्ये अनेक जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यानंतर तपासाची चक्रं फिरवण्यात आली. एकाच जागेवर बसून एक व्यक्ती ऑपरेट करत होता. यावरून या प्रकारणाचा छडा लावण्यात आला. यात भविष्यात आणखी आरोपी अडकण्याची शक्यता असून पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: APK फाईल उघडली की खात्यातले सगळे पैसे जायचे, २० कोटी जमवले, भामट्यांना बेड्या, हादरवणारी बातमी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement