आधी खून केला, मग लंगडत लंगडत गेला, नागपुरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
नागपूर: नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी भर बाजारात गोळीबार आणि कोयत्याने वार करत तरुणाचा जीव घेतला आहे. या हल्ल्यानंतर काही स्थानिक लोक मध्ये येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा एका आरोपीनं बंदूक रोखून लोकांना घाबरवलं. तर इतर दोघांनी कोयत्याने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या केली. शहराच्या गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात नक्की काय घडलं?
गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये चार हल्लेखोर दुचाकीने आले. त्यांनी घटनास्थळी येताच एका तरुणाबद्दल चौकशी करत शिवीगाळ सुरू केली. यावेळी आरोपींना सोहेल खान दिसताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
advertisement
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींवर दगडफेक ही केल्याची माहिती आहे. दरम्यान, अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 04, 2025 11:03 AM IST










