Nagpur-Indore Vande Bharat Express : नागपूर - इंदोर वंदे भारतमध्ये प्रवासी घेणार मोकळा श्वास, गाडीत अजून 8 कोचची वाढ

Last Updated:

नागपूर - इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस या गाडीमध्ये आणखी 8 कोच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अनेकांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे. 

News18
News18
नागपूर : नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवासी सुविधेत मोठी सुधारणा केली आहे. दररोजची आसन तूट आणि वेटिंग यादी वाढत असल्याने या लोकप्रिय गाडीची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय अखेर अमलात आला आहे. त्यामुळे आता या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आसनांची उपलब्धता मिळणार आहे. या गाडीमध्ये आणखी 8 कोच समाविष्ट करण्यात येणार आहेत.
नागपूर-इंदूर मार्गावरील गाडी क्रमांक 20912/20911 वंदे भारत एक्स्प्रेस सध्या आठ कोचसह धावते. मात्र मागील काही महिन्यांपासून या गाडीला प्रचंड प्रवासी मागणी असल्याने अनेकांना तिकीट मिळवणे कठीण जात होते. वाढत्या ताणाचा अभ्यास केल्यानंतर कोच वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या मंजुरीनंतर आता या गाडीमध्ये हा मोठा बदल होत आहे.
advertisement
24 नोव्हेंबरपासून गाडीची आसन संख्या दुप्पट
मध्य रेल्वेच्या अधिकृत व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, रोज सोमवार म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस 16 कोचसह धावणार आहे. नव्या रचनेत 2 एसी एक्झिक्युटिव्ह क्लास कोच आणि तब्बल 14 एसी चेअर कार्स असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, प्रशस्त आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. गाडीत कोचची संख्या एकदम दुप्पट होत असल्याने अनेक प्रवासी यातून प्रवास करू शकणार आहेत.
advertisement
प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा
यामुळे आता प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागपूर-इंदूर या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होईल. तसेच सणासुदीचा काळ आणि सुट्ट्यांमध्येही आसन उपलब्धतेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/नागपूर/
Nagpur-Indore Vande Bharat Express : नागपूर - इंदोर वंदे भारतमध्ये प्रवासी घेणार मोकळा श्वास, गाडीत अजून 8 कोचची वाढ
Next Article
advertisement
Gauri Garje Death Case: मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएला अटक, पत्नीच्या संशयास्पद आत्महत्येनंतर पोलिसांची कारवाई
पंकजा मुंडेंच्या पीएला अटक, पत्नीच्या संशयास्पद आत्महत्येनंतर पोलिसांची कारवाई
  • मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएला अटक, पत्नीच्या संशयास्पद आत्महत्येनंतर पोलिसा

  • मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएला अटक, पत्नीच्या संशयास्पद आत्महत्येनंतर पोलिसा

  • मोठी बातमी! पंकजा मुंडेंच्या पीएला अटक, पत्नीच्या संशयास्पद आत्महत्येनंतर पोलिसा

View All
advertisement