advertisement

नांदेड-वाघाळा महापालिकेचे महापौर-उपमहापौर ठरले, कुणाला लॉटरी? अशोक चव्हाणांनी करून दाखवलं!

Last Updated:

Nanded Mahapalika: काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कडून देखील महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नांदेड महापौर निवडणूक
नांदेड महापौर निवडणूक
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड : नांदेड महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नांदेड महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता आली आहे. ८१ जागांपैकी ४५ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महापौरपदासाठी भाजपाकडून कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपक रावत यांनी अर्ज दाखल केले.
परंतु महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने देखील उमेदवार दिले आहेत. १० फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी गुप्त मतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

काँग्रेस पक्षाची निराशाजनक कामगिरी

मागच्या निवडणुकीत ७३ जागा मिळणाऱ्या काँग्रेस पक्षाला यंदा मात्र केवळ दहा जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना शिंदे गटाला देखील अपेक्षित जागा मिळाली नाही. एकंदरीत भाजपसाठी हा निकाल इतिहास ठरवणारा आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय जनता पक्ष निवडणुकांना सामोरे गेला. त्यांच्या नेतृत्वात भाजपला नेत्रदीपक यश मिळाले.
advertisement

नांदेडमधलं पक्षीय बलाबल कसे?

भाजपा - ४५
शिवसेना - ४
काँगेस -वंचित आघाडी - १५
एमआयएम -१४
राष्ट्रवादी - ०२
अपक्ष - ०१
असे पक्षीय बलाबल आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नांदेड-वाघाळा महापालिकेचे महापौर-उपमहापौर ठरले, कुणाला लॉटरी? अशोक चव्हाणांनी करून दाखवलं!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement