कार्यकर्त्यांचे जय श्रीरामचे नारे, अशोक चव्हाणांनी दिली वेगळीच घोषणा, Video

Last Updated:

भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये ठीक - ठिकाणी स्वागत केले जात आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

News18
News18
नांदेड, मुजीब शेख, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली. दरम्यान त्यानंतर आता नांदेड मतदारसंघात ठिकठिकाणी अशोक चव्हाण यांचं कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत सुरू आहे. अशाच एका कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलण्यासाठी उभे राहिले असताना कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या, मात्र दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी जय श्रीराम ऐवजी या घोषणांना भारत माता की जय अशी घोषणा देत उत्तर दिलं. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  
नेमकं काय घडलं?
भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये ठीक - ठिकाणी स्वागत केले जात आहे . अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आयोजित एका कार्यक्रमात अशोक चव्हाण भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी भारत माता की जय म्हणत या घोषणांना उत्तर दिले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. याच स्वागतादरम्यान कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मात्र अशोक चव्हाण यांनी भारत माता की जय म्हणत या घोषणांना प्रत्युत्तर दिलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
कार्यकर्त्यांचे जय श्रीरामचे नारे, अशोक चव्हाणांनी दिली वेगळीच घोषणा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement