Nanded : जिगरी दोस्त गटांगळ्या खात होता, चौघे वाचवायला धावले अन् अनर्थ झाला

Last Updated:

पोहायला गेलेला मित्र बुडायला लागताच इतर तीन मित्र त्याला वाचवण्यासाठी गेले पण चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

News18
News18
मुजीब शेख, नांदेड : नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी परिसरातील खदानीत पोहण्यास गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. तर एक जण बचावला आहे. मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले सर्वजण बारावीचे विद्यार्थी आहेत. खदानीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी अनेकजण येतात. विद्यार्थीसुद्धा पोहायला आले असताना ही घटना घडलीय. मयतांमध्ये शेख फुज्जाइल, काजी मुजम्मिल, आफान आणि सय्यद सिद्दिकी याचा समावेश आहे. तर मोहम्मद फैजान हा बचावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहा तालुक्यातील झरी परिसरात विद्यापीठाच्या बाजूला एक मोठी खदान आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यात नंदेडसह परिसरातील अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी पहाटे देगलूर नाका परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी झरी परिसरात आले. त्यांनी या परिसरात फोटोसेशन करून पोहण्यासाठी खदानीत उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांकडून सध्या मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरू असून दोन मृतदेह आढळून आले आहेत. इतर दोघांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत.
advertisement
एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले
खदानी परिसरात पाचही तरुणांनी फोटोसेशन केले. त्यानंतर पोहण्याचा मोह आवरता न आल्याने मोहम्मद फैजान वगळता चौघेजण पाण्यात उतरले. आफान पोहत पोहत पुढे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला माघारी परतणे कठीण झाले. त्यात दम लागल्याने तो बुडू लागल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी इतरांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु चौघांचाही बुडून मृत्यू झाला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : जिगरी दोस्त गटांगळ्या खात होता, चौघे वाचवायला धावले अन् अनर्थ झाला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement