Supriya Sule : '..तर अजितदादांना पहिला हार मी घालणार..' फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Last Updated:

Supriya Sule : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन एक विधान केलं आहे.

News18
News18
नांदेड, 5 ऑक्टोबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. अशात काल (बुधवारी) मुख्यमंत्री सद्या बदलणार नाही, अजित पवारांना व्हायचं असेल तर पाच वर्षासाठी होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले होते. यावर 'अजितदादांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करणार असाल तर स्वागत आहे, मला आनंद आहे. पहिला हार मीच घालणार, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सोबत त्यांनी भाजपाला चिमटा देखील काढला. मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की ज्यांनी भाजपवाढीसाठी प्रयत्न केले. 70 वर्ष शतरंज्या उचलल्या, आता पंगतीत बसण्याची वेळ आली आणि त्यांना जागा नाही अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवारांचीच पण न्याय मिळाला पाहिजे : सुळे
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. मात्र, ही राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई नाही, पक्ष आपल्या जागी आहे. राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे. आई ही आईच असते, आईबद्दल प्रश्न नसतो. आणि राष्ट्रवादीची आई आणि वडीलही शरद पवारच आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण न्याय झाला पाहिजे, कारण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षातील अनेक नेते तारखा देत आहेत. परीक्षा उद्या आहे यांना निकाल कसा माहीत? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. याचा अर्थ एक तर पेपर फुटला जो आम्हाला मिळाला नाही, नाही तर काही तरी गडबड आहे. दिल्लीतील अदृश्य हात, जे महाराष्ट्रचे खच्चीकरण करत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
भाजपला अनेक मित्र पक्ष सोडून जात आहेत, बच्चू कडू साधे आहेत ते खर बोलले : सुळे
भाजप आधी मित्र पक्षाना जवळ करते नंतर अफजल खानासारखी मिठी मारते. मित्र पक्षाचे खच्चीकरण करते, असं बच्चू कडू म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचे अनेक मित्र पक्ष त्यांना सोडून जात आहेत. बच्चू कडू साधे आहेत ते खर बोलले अस सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
मी आरोग्य मंत्री असते तर आठ दिवस नांदेडला राहिले असले : सुप्रिया सुळे
नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण वाढले. अश्या परिस्थितीत तुम्ही आरोग्य मंत्री असता तर काय केलं असतं असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. तेव्हा मी आरोग्य मंत्री असते तर आठ दिवस नांदेडला राहिले असते, संभाजीनगर, नागपूरला राहिले असते. मुंबईत काय माझं गाठोठं आहे का? आणि कोणी राजीनामा मागितला असता तर राजीनामा दिला असता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Supriya Sule : '..तर अजितदादांना पहिला हार मी घालणार..' फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement