Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह काढलं तर..' कार्यकारिणीत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत मोठे वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (प्रशांत रामदास, प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरु आहे. अशातच दोन्ही गटाच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत पक्षाची आगामी भूमिका मांडली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, की यापूर्वी अशी अनेक राजकीय पक्षांकडे आली आहे. जे आम्हाला सोडून गेले आहे त्यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी आम्हाला मिळेल असा दावा करीत आहे अजून सूनवणी सुरू झाली नाही. मी हे समझु शकत नाही, हे असे कसे होवू शकते? जे लोक सोडून गेले आहे ते म्हणतात याला काही तरी आधार आहे पण चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले होते. निवडणूक चिन्ह हा महत्वाचा आधार आहे. आता मतदार यापर्यंत पोहचले आहे की निवडणूक निशाणी बदलली की मतदार आपला विचार बदलतात.
advertisement
काँग्रेसमध्ये वाद झाला होता त्यावेळी दोन गट झाले होते. त्यावेळी चरखा मिळाला होता तरी आम्हीं जिकलो. निवडणूक निशाणी बदल्यानी काही लोकांचा कट होवू शकतो. चिंता करण्याची गरज नाही देशाचा वातावरण बदलत आहे. गोवामध्ये भाजप नव्हती ती आमदारांना खरेदी करून आली. महाराष्ट्रात कट करून भाजप सत्तेवर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर कट करून आली. अनेक राज्यात भाजप नाही. भाजपला दूर ठेवण्याचा कल जनतेचा आहे.
advertisement
आज मोदींच्या हातात सत्ता आहे. इमानदार नेते असले तर जनता सोबत राहते. भाजप इमानदार नाही त्यामुळे जनता त्यांना नाकारेल. मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी जाण्याची गरज होती. पण त्यांनी तसे केले नाही, अशा अनेक गोष्टी सांगू शकतो.
संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदीच्या विरोधात लिहाले तर त्यांना 8 महिने तुरुंगात ठेवले. कोर्टाने त्यांना जामीन दिला. राजकीय पक्षाच्या नेत्यांना सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून तुरुंगात टाकणे हे जनतेला आवडले नाही. आता राजकीय पक्षाच्या विरोधात कारवाई करण्याचा विचार भाजपचा आहे. जुन्या काळात शासकीय कार्यक्रमात जाताना राजकीय बोलत नव्हते. पण आताचे पंतप्रधान जातात तर फक्त विरोधी पक्षाच्या विरोधात बोलतात. राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्ट आहे असे पंतप्रधान म्हणतात. ज्यांच्या विरोधात आरोप केले जाते त्यांना चार दिवसात मंत्री बनविले.
advertisement
आताचे आठ मंत्री माझ्याकडे आले होते ईडी कारवाई आमच्या विरोधात सुरू झाली. भाजपने निवडणूक निशाणी बदलली पाहिजे असे लोक म्हणतात. भाजपने आता वाशिंग मशीन निवडणूक निशाणी केली पाहिजे असे लोक म्हणतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
advertisement
काल एका मीडिया संस्थेच्या विरोधात केंद्र सरकार कारवाई केली. आज सर्व प्रसारमाध्यमांनी निषेध केला. मला पूर्ण विश्वास आहे देशात बदल होईल. लोकसभेत निवडणूक होईल तेव्हा देशाचे चित्र बदलेल. ज्या विरोधी पक्षाच्या राजकीय पक्षामध्ये मतभेद आहेत त्यांना एकत्र आणायचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह काढलं तरी ते फरक पडणार नाही, देशाचा माहोल बदलत आहे. शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत मोठे वक्तव्य केलं आहे.
Location :
Delhi
First Published :
October 05, 2023 3:37 PM IST
मराठी बातम्या/देश/
Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह काढलं तर..' कार्यकारिणीत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य