Maratha Reservation : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा घेराव; आरक्षणावरुन विचारला जाब
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maratha Reservation : अशोक चव्हाण यांना सकल मराठा समाजाने घेराव घालत जाब विचारल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे.
नांदेड, 9 सप्टेंबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे. काल (शुक्रवारी 8 सप्टेंबर) जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतून काही निष्पन्न न झाल्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. दुसरीकडे राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आता थेट लोकप्रतिनिधींनी जाब विचारण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना याचा अनुभव आला.
अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा घेराव
आरक्षणासाठी सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन आता राज्यभर पसरत आहे. या आंदोलकांच्या रोषाचा सामना आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आज काँगेसच्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अशोक चव्हाण गेले होते. काँगेस पदाधिऱ्यांनीची बैठक सुरू असताना बाहेर सकल मराठा समाजाकडून घोषणा बाजी सुरू होती. बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण जमावापुढे गेले. तेव्हा मोठा जमाव जमला होता. अशोक चव्हाण त्या जमावाला सामोरे गेले. त्याचवेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून घेराव घालण्यात आला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर अंदोलन सुरू आहे, मग तुम्ही असे कार्यक्रम का घेता? असा जाब एका युवकाने विचारला. त्याच सोबत तुमचा निषेध करतो, असं तो तरुण बोलला. त्याला उतर देताना तुझा पण निषेध, असं अशोक चव्हाण म्हणाले. हा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण अशोक चव्हाण यांनी धर्माबाद येथील काँगेसचा कार्यक्रम अर्धंवट सोडला नाही. हा प्रकार नंतर झाला असा दावा केला आहे.
advertisement
मराठा-कुणबी वाद उद्भवण्याची शक्यता
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी घेऊन अंतरवाली सराटीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कुणबी नोंद असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी असलेल्या जरांगे यांनी नंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आणि वेगळ्या वादाला सुरुवात झाली.
advertisement
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला अनिल देशमुख यांनी विरोध केला असून सरकार अशी मागणी मान्य करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देशमुख यांनी दिला. स्थानिक ओबीसी सेलचे भाजप पदाधिकारी यांनी देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवित आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. सर्व शाखीय कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व पक्षीय कुणबी नेते एकत्रित आले होते. यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
Location :
Nanded Waghala,Nanded,Maharashtra
First Published :
September 09, 2023 8:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Maratha Reservation : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा घेराव; आरक्षणावरुन विचारला जाब