Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा नांदेडमध्ये दुसरा बळी, फीसाठी पैसे नसल्याने दहावीतील मुलाने संपवलं जीवन

Last Updated:

Maratha Reservation : नादेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा दुसरा बळी गेला आहे. एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

नादेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा दुसरा बळी
नादेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा दुसरा बळी
नांदेड, 22 ऑक्टोबर (मुजीब शेख, प्रतिनिधी) : मराजा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेलं असतानाच एक मोठी बातमी नांदेडमधून समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी आज नांदेडमध्ये दुसरा बळी गेला आहे. नायगाव तालुक्यातील भोपळा येथील शालेय विद्यार्थ्याने जीवन संपवले. दहावीत शिकणारा 17 वर्षीय ओमकार बावणे याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली. शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून त्याने टोकाचं पाऊल उचललं.
नांदेड जिल्हयात मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसात दोन आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले. काल पहाटे हदगाव तालुक्यातील वडगाव तेथील 24 वर्षीय तरुण शुभम पवार याने विष पिऊन आत्महत्या केली होती. आज रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी आणखी एकाने नांदेडमध्ये आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथे एका शालेय विद्यार्थ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय ओमकार बावने याने विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली.
advertisement
आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझे आई वडील मोल मजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. सद्या नायागव ग्रामीण रुग्णालयात मतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या दोन आत्महत्यांमुळे उद्या नांदेड जिल्हात मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा नांदेडमध्ये दुसरा बळी, फीसाठी पैसे नसल्याने दहावीतील मुलाने संपवलं जीवन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement