मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तपोवन एक्स्प्रेस 2 दिवस रद्द, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Tapovan Express: मराठवाड्यातून मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस 2 दिवस बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदेडवरून मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.
1 मार्च रोजी नांदेडवरून मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 17618) ही 1 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच 2 मार्च रोजी मुंबईवरून नांदेडसाठी सुटणारी तपोवन एक्स्प्रेस (गाडी क्र. 17617) रद्द करण्यात आली आहे. याशिवाय इतरही काही रेल्वेगाड्यावर मुंबई स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामाचा परिणाम झाला असून नंदीग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
28 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी बल्लारशावरून सुटणारी नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती दादर पर्यंतच धावणार आहे. तसेच 1 मार्च रोजी लिंगमपल्लीवरून मुंबईसाठी सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी केवळ दादरपर्यंतच धावणार आहे. दरम्यान, तपोवन गाडी रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे देखील रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 28, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, तपोवन एक्स्प्रेस 2 दिवस रद्द, कारण काय?