Crime News : नांदेडमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या, घटनेने जिल्ह्यात खळबळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : नांदेड जिल्ह्यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : नांदेडमधून क्रूरतेचा कळस गाठणारी एक बातमी समोर आली होती. मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. रविवारी दुपारपासून ही चिमुकली बेपत्ता होती. मुलगी सायंकाळ घरी न परतल्याने कुटुंबासह गावकऱ्यांनी तिचा शोध घेतला. पण, ती मुलगी मिळाली नाही. सोमवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड ऊमरी रोडवर रस्त्याशेजारी झुडुपात फेकलेला आढळला. आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर आल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे काल (सोमवारी) मृत अवस्थेत मिळालेल्या 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील मुलीचे 14 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. काल या चिमुकलीचा मृतदेह गावापासून 12 किलोमिटर दूर मुदखेड उमरी रोडवर आढळला होता. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्ह्याची कलमे वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची वेगवेगळी पथकं परिश्रम घेत आहेत. संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
advertisement
अशोक चव्हाणांकडून पीडित कुटुंबाची भेट
मुदखेडमधील घटनेनंतर मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. घटना अतिशय चीड निर्माण करणारी आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध लावावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. भाजप आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांनीही पीडित कुटुंबाची भेट त्यांचे सांत्वन केलं होतं.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
January 16, 2024 9:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Crime News : नांदेडमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या, घटनेने जिल्ह्यात खळबळ