Nanded News : IPL बेतलं जीवावर? नांदेडमध्ये स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन आत्महत्या
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded News : नांदेडमध्ये आयपीएलच्या सट्ट्याच्या व्यवहारातून एकाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : सध्या देशात आयपीएल (IPL) सामन्यांचा सीझन सुरू आहे. यावर अनेकजण सट्टेबाजी करत असल्याचेही उघड झाले आहे. मात्र, आता यातून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एका व्यापाऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. सट्ट्याच्या व्यवहारातून आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा व्हिडियो मयत शेख सत्तार यांनी केला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेख सत्तार यांचा मुखेडमध्ये फायनान्सचा व्यवसाय आणि मोबाईल शॉप आहे. आज दुपारी त्यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा मोबाईलवर व्हिडिओ शूट केला आहे. फेरोज मोहम्मद सय्यद हा सट्टेबाज सट्ट्याच्या पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. मयत शेख सत्तार आणि आरोपी फेरोज मोहम्मद सय्यद यांच्यामध्ये सट्ट्याच्या पैश्यांची देवाणघेवाण होती.
advertisement
वाचा - Crime News: मुलगा आहे की मुलगी? पाहण्यासाठी पतीनं पत्नीचं पोट विळ्यानं फाडलं
फेरोज मोहम्मद सय्यदसाठी मयत शेख सत्तार हे आयपीएल मॅचवरील सट्टा घेत होते का? असा संशय या व्हिडिओ वरून पोलिसांना आहे. जवळपास 40 ते 50 लाख रुपयांच्या सट्ट्यावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करताहेत. सट्टा बाजारातील व्यवहार आणि पैश्याच्या देवाण घेवाणीतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगीतले असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
May 24, 2024 11:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded News : IPL बेतलं जीवावर? नांदेडमध्ये स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन आत्महत्या