Nanded Crime : अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध, आईवडिलांनी झोपतच तिला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी केला बनाव
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील ऑनर किलिंग प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील हिकायतनगर येथील ऑनर किलिंगच्या प्रकरणात शनिवारी पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना अटक केली. समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्याने वार करून हत्या केली होती. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. अंकिता रामराव पवार, (वय 17 वर्ष) असे मयत मुलीचं नाव आहे.
परजातीय मुलाशी प्रेमसंबंध असल्याने संपवलं
हिमायत नगर शहरातील अंकीता पवार या 17 वर्षीय मुलीचे परजातीय मुलासोबत प्रेम संबंध होते. महिनाभरापूर्वी त्या मुलासोबत अंकीता पळून गेली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी तिला घरी पाठवले होते. पण त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. कुटुंबीयांना तिचे प्रेम संबंध मान्य नव्हते. याच कारणानं मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीचा हत्या केली. विळ्याने वार करून अंकीता पवार हिची हत्या करण्यात आली. मुलगी झोपेत असताना आई-वडिलानी विळ्याने वार करून तिची हत्या केली.
advertisement
आत्महत्या केल्याचा बनाव
हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव आई वडिलांनी केला होता. पण पोलिसांना घटनेबाबत संशय होता. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला. मुलीच्या डोक्यात आणि अंगावर गंभीर जखमा असल्याचा अहवाल वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला. त्याच कारणाने मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले. वैद्यकिय अहवाल आणि घटना स्थळावरील पुराव्यावरुन खून झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. आज मयत मुलीचे वडील रामराव पवार आणि आई पंचफुला पवार यांना अटक करण्यात आली आहे.
advertisement
समाजात बदनामीच्या भितीने केलं कृत्य
मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून, समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत अंकिता ही शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना विळ्याने सपासप डोक्यावर, कपाळावर वार करून तिला संपवलं. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मयत मुलीचं प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मुलीच्या खून प्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेत,ले अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच मुलीच्या खुनप्रकर्णी कलम 302 अंतर्गत आरोपी पंचफुलाबाई रामराव पवार, आणि रामराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 03, 2024 2:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Crime : अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध, आईवडिलांनी झोपतच तिला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी केला बनाव