Wardha News: मुलाच्या अनैतिक संबंधाला विरोध करणं आईला भोवलं; लेकानं डोक्यात वरवंटा घालून संपवलं

Last Updated:

एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्याला आईने विरोध केल्याने मुलाने आईची हत्या केली. त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा जीव घेतला.

मुलानेच घेतला आईचा जीव (प्रतिकात्मक फोटो)
मुलानेच घेतला आईचा जीव (प्रतिकात्मक फोटो)
वर्धा (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील काचनुर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका मुलानेच आपल्या आईची हत्या केली. एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्याला आईने विरोध केल्याने मुलाने आईची हत्या केली. त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा जीव घेतला. याप्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.
या घटनेत आईचा मृत्यू झाला असून मृतक महिलेचं नाव मीरा मुरलीधर पुसदकर असं आहे. मुलाचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे आई या संबंधाला विरोध करत होती. याच कारणावरुन दोघांच्यात वाद झाला. आरोपी मुलगा सोपान मुरलीधर पुसदकर याने आईशी भांडण करत तिच्या डोक्यात वरवंटा घातला. यात आईचा मृत्यू झाला आहे. मृतक महिलेचं नाव मीरा मुरलीधर पुसदकर असं आहे. मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रियकरासाठी पतीला संपवलं -
दरम्यान, अहमदनगरमधूनही एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यात प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून संपवलं. पतीला संपवण्यासाठी चक्क दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी, तिच्या प्रियकरासह पुण्यातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे योगेश सुभाष शेळके या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने योगेशच्या खुनाचा कट रचला. विशेष म्हणजे पत्नीनेच पोलिसांत याबाबत फिर्याद दिली होती. फिर्यादीच आरोपी निघाल्याने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Wardha News: मुलाच्या अनैतिक संबंधाला विरोध करणं आईला भोवलं; लेकानं डोक्यात वरवंटा घालून संपवलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement