Honor Killing : अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, आई-वडिलांनी मुलीच्या गळ्यावर चालवला विळा; नांदेड 'सैराट'ने हादरलं!
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Honor Killing : नादेडमध्ये समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा विळ्याने वार करून हत्या केली.
imeनांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्याने वार करून खून केला आहे. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अंकिता रामराव पवार, (वय 17 वर्ष) असे मयत मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर नांदेड एलसीबीचे पथक व धर्माबाद येथील धर्माबादचे उपविभागीय अधिकारी व भोकर पोलीस तळ ठोकून आहेत.
याबाबत हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात पवार कुटुंब राहते आहे. या कुटुंबातील मुलीचे सूत परिसरातील एका युवकाशी प्रेमसंबंध होते, हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीस समजाऊन सांगून इतर जातीच्या मुलासोबत प्रेम करण चुकीचे आहे, असा समज दिला होता. तरीदेखील मागील महिन्याभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तेंव्हा घरच्यांनी पळून नेणाऱ्या विरोधात हिमायतनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोस्को अंतर्गत प्रेम करणाऱ्या युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थागुशाच्या पथकाने मुलीला समजुन आई वडिलांच्या स्वाधीन केले होते. मात्र मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, पुन्हा देखील ती पळून गेलेल्या त्या मुलासोबत लग्न करतो असा अट्टहास करत होती.
advertisement
त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून, समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत अंकिता ही शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना विळ्याने सपासप डोक्यावर, कपाळावर वार करून तिला यमसदनी धाडले आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मयत मुलीचं प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून मुलीच्या खून प्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेतले अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच मुलीच्या खुनप्रकर्णी कलम 302 अंतर्गत आरोपी पंचफुलाबाई रामराव पवार, आणि रामराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.
advertisement
वाचा - वृद्धाने ओलांडल्या सर्व मर्यादा, अल्पवयीन नातीसोबत धक्कादायक कांड
दरम्यान धर्माबादचे उपविभागीय अधिकारी संपते सर व पीएसआय पाटील भोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून, वृत्त लिहिपर्यंत वरिष्ठ अधिकारी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. तर या गुन्ह्यात तपास कामी एलसीबी पथकाचे पीएसआय मुंडे मैसनवाड, सुरेश घुगे, तानाजी येळगे, शंकर केंद्रे यांनी देखील कामगिरी केली आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 02, 2024 9:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Honor Killing : अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, आई-वडिलांनी मुलीच्या गळ्यावर चालवला विळा; नांदेड 'सैराट'ने हादरलं!