मराठा आंदोलकानं झुगारला जरांगेंचा आदेश; आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी
- Published by:Priya Lad
Last Updated:
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रास्ता रोको केला जातो आहे. हे आंदोलन शांततेत करावं असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
मुजीब शेख/नांदेड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. पण आता आंदोलनही पुकारण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यभरात रास्ता रोको केला जातो आहे. हे आंदोलन शांततेत करावं असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पण मराठा आंदोलकाने त्यांचा आदेश झुगारत गाडी पेटवली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी इथं रास्ता रोको करताना एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी जाळली आहे. शिवहरी लोंढे असं या व्यक्तीचं नाव. त्याने आक्रमक होत स्वतःचीच गाडी पेटवली आहे. आंदोलनादरम्यान त्याने मुख्य रस्त्यावर आपली दुचाकी आणली आणि पेटवून दिली. या पेटलेल्या गाडीचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
advertisement
रास्ता रोको करताना शांततेत आंदोलन करा ही विनंती जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केली. 11 ते 1 याच वेळेत रास्ता रोको करण्यास सांगितलं. त्यानंतर धरणं आंदोलन केलं जाणार आहे. परीक्षा लक्षात घेता कोणत्या विद्यार्थ्याला पेपरला जाण्यात अडचण येऊ नये याचा विचार करून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
नांदेडमध्ये मराठा आंदोलकाने रास्ता रोकोवेळी जाळली बाईक pic.twitter.com/EExMqPGo89
— News18Lokmat (@News18lokmat) February 24, 2024
advertisement
सगे सोयरेची अमंलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवायचं नाही असं जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं. उद्या दुपारी अंतरवालीत समाजाची बैठक आहे. निर्णायक बैठक उद्या घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
जालन्यात मराठा आंदोलन 5 मिनिटात पाडलं बंद
जालन्यातील समृद्धी महामार्गावरील मराठा समाजाचं आंदोलन पोलिसांनी पाच मिनिटांतच हाणून पाडलंय.. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातील समृद्धी महामार्गावर मराठा समाजानं आंदोलन केलं. सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरु करण्यात आलं.. मात्र पोलिसांनी याठिकाणी येत अवघ्या पाच मिनिटातच हे आंदोलन हाणून पाडलंय. त्यामुळं आंदोलक मराठा समाज नाराज झाला.
advertisement
बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या 50 मराठा आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी या मराठा आंदोलकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता आतमध्ये नेत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळं तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय.
advertisement
लातूरमध्ये आंदोलक-पोलीस यांच्यात बाचाबाची
लातूर शहरात ही मराठा आंदोलकांच्या वतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालीय , आंदोलनादरम्यान अडकलेल्या गाड्या सोडण्यावरून पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झालीय. तर पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलय . पोलिस अधीक्षक यांची गाडी या चक्का जाम आंदोलनात अडकली होती पोलिसांनी वाहने काढत पोलिस अधीक्षक यांची गाडी बाहेर काढली , तर पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना अडचण होत असल्यासच सांगत मराठा आंदोलकांना विनंती केली आहे , मात्र आंदोलक आंदोलन करण्यावर ठाम आहेत . ठिय्या मांडत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या आहेत .
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
February 24, 2024 12:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
मराठा आंदोलकानं झुगारला जरांगेंचा आदेश; आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी