Nanded : उद्धव ठाकरेंच्या स्वागताला जेसीबीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली, 21 जेसीबी स्वागताविना परतले
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नांदेड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या जंगी स्वागताची तयारी केली असताना जेसीबीने स्वागतासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे
मुजीब शेख, नांदेड, 27 ऑगस्ट : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली इथं सभा आहे. या सभेसाठी ते नांदेड विमानतळावर उतरणार असून तिथून गाडीने हिंगोलीला जाणार आहेत. दरम्यान, त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली असताना जेसीबीने स्वागतासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्रीही विमानतळावर येणार असल्याने दडपणातून परवानगी नाकारलीय असा आरोप केला.
उद्धव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत. येथून ते हिंगोली येथील जाहीर सभेसाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे नांदेडला येणार असल्याने शिवसैनिकांनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली होती. 21 जेसीबीद्वारे विमानतळाबाहेर त्यांचे स्वागत करण्यात येणार होते. स्वागतासाठी जेसीबीही आणण्यात आले होते. पण विमानतळाबाहेर जेसीबीद्वारे स्वागत करण्यास पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे आणलेले जेसीबी परत पाठवण्यात आले.
advertisement
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नांदेड विमानतळावर येणार आहेत. त्याच दडपणातून परवानगी नाकारल्याचा आरोप शिवसेनेने केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी इथं जाण्यासाठी नांदेड विमानतळावर उतरणार आहेत. नांदेडमधून ते हेलिकॉप्टरने परभणीला जातील. परभणीतील कार्यक्रम आटोपून दुपारी ते पुन्हा नांदेड विमानतळावर येतील आणि तिथून मुंबईत येणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2023 11:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded : उद्धव ठाकरेंच्या स्वागताला जेसीबीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली, 21 जेसीबी स्वागताविना परतले