लाडक्या बहीणींचे पैसे पोहोचले थेट सीएसी सेंटर चालकाच्या खात्यात, नांदेडमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, मात्र आता या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे.
नांदेड, प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. महिला आर्थिकदृष्या सक्षम व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र आता या योजनेत अनेक ठिकाणी गौरप्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे. नांदेडमधून देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड नंबर ऐवजी त्यांच्या पतीचा आधार नंबर अर्ज भरताना दिला आणि त्यानंतर त्यांच्या खात्यात आलेली रक्कम सीएससी सेंटर चालकानं परस्पर हाडप केल्याचं समोर आलं आहे. घोटाळा उघड होताच हा सेंटर चालक फरार झाला आहे.
ही घटना नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील मनाठा येथील आहे. सीएससी सेंटर चालकानं आधार कार्डाचा दुरपयोग करून लाखो रुपये उकळले आहेत. या सीएसी सेंटर चालकांनी लाभार्थी महिलांच्या पतींना रोजगार हामीचे पैसे आल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रं घेण्यात आले. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जावर त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी त्यांच्या पतीचा आधार क्रमांक टाकण्यात आला.
advertisement
पतीच्या खात्यात पैसे जमा झाले, मात्र या सीएसी सेंटर चालकानं रोजगार हामीचे पैसे असल्याचं सांगून त्यांच्या खात्यातून ते परस्परच उकळले. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. घटना उघड होताच सीएसी सेंटर चालक पसार झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2024 9:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
लाडक्या बहीणींचे पैसे पोहोचले थेट सीएसी सेंटर चालकाच्या खात्यात, नांदेडमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा